शिवसेना विभागप्रमुख मूरकर यांना डच्चू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना विभागप्रमुख मूरकर यांना डच्चू
शिवसेना विभागप्रमुख मूरकर यांना डच्चू

शिवसेना विभागप्रमुख मूरकर यांना डच्चू

sakal_logo
By

गोळप शिवसेना प्रमुख
नंदा मूरकर यांना डच्चू
सामंत यांचे निकटवर्ती ; निष्ठावंतामध्येही नाराजी
पावस, ता. २४ः गेली अनेक वर्षे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करत असलेल्या गोळप शिवसेना विभागप्रमुख नंदा मूरकर यांना पदावरून काढण्यात आले असून, त्या जागी नवीन शिवसैनिकाची निवड करण्यात आली आहे.हेमंत पवार यांच्या गळ्यात या पदाची माळ पडली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटात सामील झालेले उदय सामंत यांच्याशी मूरकर यांची असलेली जवळीक त्याना नडली आहे. या निर्णयानंतर मूरकर काय भूमिका घेतात याकडे या परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.
मुरकर गेली अनेक वर्षे एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करत सातत्याने पक्षवाढीचा प्रयत्न करून पक्षाला न्याय देण्याचं काम केले. तसेच गटातील अनेक ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. हे करत असताना त्यांनी भाजपाच्या अस्तित्वाला धोका निर्माण करून सेनेचे तळागाळात अस्तित्व निर्माण केले. त्यामुळेच संघटनेने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोळप गटामध्ये विभागप्रमुख पद देऊन सक्रिय केले होते. त्यामुळे आमदार स्थानिक विकासनिधी, खासदार स्थानिक विकास निधी अशा विविध निधींच्या माध्यमातून या गटाला विकासकामांच्यादृष्टीने अग्रेसर ठेवण्याचे काम केले. त्या पद्धतीने त्यांच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक गावांमध्ये विकासकामांचा झंजावात सुरू राहिला होता.
शिवसेना हा एककलमी कार्यक्रम हातात घेऊन वाडीच्यादृष्टीने सातत्याने अग्रेसर असताना त्यांना अचानकपणे विभागप्रमुख पदावरून दूर करण्यात आले व नव्या विभागप्रमुखांची निवड करण्यात आली. त्यामुळे मुरकर व त्यांच्या समर्थकांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. तालुक्याचे आमदार आज जरी शिंदे गटात गेले असले तरी गेली सात वर्षे त्यांच्याच म्हणजे सेनेच्या विकासनिधीतून या परिसरामध्ये चांगल्या तऱ्हेने कामे सुरू असताना निव्वळ आमदारांच्या माध्यमातून विकास निधी आणत असल्यामुळे त्यांचे समर्थक म्हणून समजले जाऊन पदावरून कमी करण्यात आल्याने गटामध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. पक्षांमध्ये प्रामाणिकपणे काम करत असताना पक्षांतर्गत दरी निर्माण झाल्याने भविष्यात उद्धव सेनेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.