सागरतीर्थ परिसराची श्रमदानातून स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सागरतीर्थ परिसराची 
श्रमदानातून स्वच्छता
सागरतीर्थ परिसराची श्रमदानातून स्वच्छता

सागरतीर्थ परिसराची श्रमदानातून स्वच्छता

sakal_logo
By

58473
आरवली ः सागरतीर्थ डोंगर परिसर स्वच्छता उपक्रमात सहभागी तरुण.

सागरतीर्थ परिसराची
श्रमदानातून स्वच्छता
वेंगुर्ले ः नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्राच्या स्वच्छ भारत मिशन २.० मोहिमेंतर्गत तालुक्यातील आरवली-सागरतीर्थ येथील डोंगर परिसराची स्वच्छता करण्यात आली. नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग व वेताळ प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावेळी वेंगुर्ले तालुक्यातील पर्यटन स्थळ असलेल्या सागरतीर्थ येथील डोंगर परिसराची स्वच्छता करण्यात आली. सागरतीर्थ किनाऱ्यापासून जवळच असलेल्या डोंगर परिसरातील निसर्गरम्य वातावरण आणि उंचावरून होणारे विलोभनीय समुद्र दर्शन यामुळे पर्यटकांची या स्थळाला नेहमीच पसंती असते. त्यामुळे या डोंगर परिसरात असलेला प्लास्टिक व इतर स्वरुपातील कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर पायथ्याशी असलेल्या सुरूच्या बनातील प्लास्टिक व दीर्घकाळ टिकणारा अविघटनशील कचरा उचलून परिसर स्वच्छता करण्यात आली. वेताळ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानातून स्वच्छता उपक्रम यशस्वीपणे राबविला.
...................
देवगडमध्ये लक्ष्मीपूजन
देवगड ः येथील बाजारपेठेसह तालुक्याच्या विविध भागात आज लक्ष्मीपूजन उत्साहात झाले. पहाटे फटाक्यांच्या आतषबाजीने शहराला जाग आली. सायंकाळी व्यापार्‍यांनी लक्ष्मीपूजन केले. यावेळी फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. आज नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन सण एकाच दिवशी होता. पहाटे बच्चे कंपनीने बनविलेल्या नरकासुरांचे दहन करून आनंद साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच शहरात फटाक्यांचा आवाज घुमत होता. दिवसभर नागरिकांनी एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. सायंकाळी शहरात लक्ष्मीपूजन झाले. व्यावसायिकांनी फुलांच्या माळा लावून समोर रांगोळी घालून तसेच पणत्या प्रज्वलित करून लक्ष्मीपूजन केले. यानिमित्त फटाके फोडण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत नागरिकांची वर्दळ सुरू होती.