सदस्य नियुक्ती रद्दची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदस्य नियुक्ती रद्दची मागणी
सदस्य नियुक्ती रद्दची मागणी

सदस्य नियुक्ती रद्दची मागणी

sakal_logo
By

सदस्य नियुक्ती रद्दची मागणी
कणकवली,ता.२४ ः ‘सिंधुरत्न'' योजनेच्या सिंधुरत्न कार्यकारी समितीवर यापूर्वी करण्यात आलेल्या दोन विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात. त्यांच्याजागी प्रतिथयश व्यावसायिक किरण सामंत व माजी आमदार प्रमोद जठार यांची नियुक्ती करावी, अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून चिपळूणचे आमदार शेखर निकम व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी प्रफुल्ल सुद्रिक यांची नियुक्ती केली होती; मात्र काही महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर केसरकरांनी समितीवरील विशेष निमंत्रित सदस्य बदलण्याची मागणी केली आहे. सामंत हे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत. तर प्रमोद जठार हे २००९ ते २०१४ या काळात भाजपचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.