ओटवणे पंचायतनात रंगला ‘किरणाभिषेक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओटवणे पंचायतनात रंगला ‘किरणाभिषेक’
ओटवणे पंचायतनात रंगला ‘किरणाभिषेक’

ओटवणे पंचायतनात रंगला ‘किरणाभिषेक’

sakal_logo
By

58467
ओटवणे ः श्री देवी सातेरी रवळनाथ पंचायतन देवस्थानातील मूर्तीला सूर्यकिरणांचा झालेला अभिषेक.
58494
ओटवणे ः किरणाभिषेक सोहळ्यास उपस्थित भाविक.


ओटवणे पंचायतनात रंगला ‘किरणाभिषेक’

पारंपरिक सोहळा; सूर्यकिरणांच्या दीपोत्सवाने दिवाळी साजरी

महेश चव्हाण ः सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २४ ः येथील श्री देवी सातेरी रवळनाथ पंचायतन देवस्थानचा वार्षिक सूर्यकिरण अभिषेक सोहळा आज पारंपरिक पद्धतीने पार पडला. विविध मंदिरांची पंढरी असलेल्या पंचायतनातील मंदिरातील सर्व देवतांना सूर्याच्या लक्षमयी तेजस्वी किरण प्रकाशाने दीपमान करून मंदिरात दिवाळी साजरी करण्यात आली.
सावंतवाडी राजेशाही संस्थानाची ऐतिहासिक परंपरा लाभलेला ओटवणे रवळनाथ मंदिरातील प्रत्येक सोहळा वैविध्यपूर्ण असतो. श्री देव रवळनाथासहित इतर मंदिरातील म्हणजे श्री देवी सातेरी, श्री देव महादेव, श्री देवी भगवती, श्री देव कंकाळ मंकाळ, श्री देव क्षेत्रफळ, श्री देव वेतोबा, श्री देव म्हारिंगण, श्री जेष्ठा देवी, बाराचा चव्हाटा या मंदिरातील मूर्तींना सूर्यकिरणांचा तेजोमय अभिषेक वाहिला जातो. पहाटे मंदिरातील देवतांना तेल व चंदनाने अभंग्यस्नान व मंदिराचा परिसर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर श्री देव रवळनाथाला तसेच देवतांना वस्त्रांनी सजविण्यात आले. गावरहाटीतील प्रमुख मानकऱ्यांसह दैविक सेवक व भाविक मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थिती होते. या दिवशी आरशाच्या साहाय्याने सूर्यकिरणे परावर्तित करून मूर्तींवर किरणांचा अभिषेक करण्यात आला. सूर्यकिरणांच्या अभिषेकात श्री देव रवळनाथाचे स्वयंभू रुप अधिक तेजस्वी वाटते. खाली समुद्र, त्यावर कासव, पंचफणी शेषनाग, त्यावर शिवलिंग आणि शिवलिंगावर श्री देव रवळनाथ उभा असलेल्या मूर्तीवर सूर्याची किरणे पडली की देवाची जागृकता व तेजस्वी दाहकतेचे दर्शन झाले. यावेळी गाभाऱ्यासहित मंदिर तेजोमय होऊन गेले. श्री देव रवळनाथाचे हे तेजस्वी रुप पाहण्यासाठी शेकडो भाविकांनी उपस्थिती दर्शविली. महाआरतीने उत्सवाची सांगता झाली.
---
प्रत्येक मंदिराची रचना अभूतपूर्व
राजाश्रय लाभलेल्या या पंचायतनातील प्रत्येक मंदिराची रचना अभूतपूर्व आहे. पाचशे वर्षांपूर्वीचा स्थापत्य कलेचा उत्तम नमुना मंदिरे पाहिली की लक्षात येतो. सूर्योदय आणि सूर्यास्ताची किरणे श्री देव रवळनाथासह प्रत्येक मंदिरातील देवतांच्या चरणांशी अभिषेक घालतील, अशी रचना प्रत्येक मंदिराची आहे. मंदिरालगतच राजवाडा असल्याने या सोहळ्याला त्यावेळी राज परिवार उपस्थित राहून मंदिरात दिवाळी साजरी करत होता, असे जाणकार सांगतात.