खेड पालिकेचे स्वच्छता अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड पालिकेचे स्वच्छता अभियान
खेड पालिकेचे स्वच्छता अभियान

खेड पालिकेचे स्वच्छता अभियान

sakal_logo
By

rat२४p१२.jpg
५८४४२
खेडः नागरिकांना स्वच्छतेविषयी माहितीपत्रके देताना नगर पालिकेचे कर्मचारी.

खेड पालिकेचे स्वच्छता अभियान
खेड ः येथील नगर पालिकेकडून माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला गती देण्यात आली आहे. या अभियानांतर्गंत नगर पालिकेच्या कर्मचार्‍यांकडून प्रत्येक प्रभागात जाऊन घरगुती कचरा वर्गीकरण व प्लास्टिकबंदीची माहिती दिली जात आहे. माहितीपत्रके वितरित करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियान नागरी २.० अंतर्गत स्वच्छ अमृत महोत्सव पंधरवडा राबवण्यात आला. या अंतर्गत नगर पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फंत प्रबोधनकार ठाकरे उद्यानात स्वच्छतामोहीम राबवली होती. माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरात स्वच्छतेविषयक विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या उपक्रमातंर्गत नगर पालिकेचे कर्मचारी प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांमध्ये व्यापक स्वरूपात जागृती करत शहर चकाचक ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करत आहेत. प्रभारी मुख्याधिकारी विनोद डवले, नगर पालिका स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी उपक्रम यशस्वी करत आहेत.
----------------
कदम महाविद्यालयाचे प्रश्‍नमंजुषेत यश
खेडः भरणे येथील तु. बा. कदम महाविद्यालयाने जिल्हा शासकीय रुग्णालय आयोजित एचआयव्हीविषयी जिल्हास्तरीय प्रश्‍नमंजुषा स्पर्धेत यश प्राप्त केले. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या श्रुती पवार व पुरूषोत्तम आंबेकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना प्रशस्तीपत्रक व रोख पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे सचिव अ‍ॅड. तु. ल. डफळे, धुमक, राजाराम बैकर, बाबाराम तळेकर, दत्ताशेठ बैकर, प्राचार्य साळुंखे, एनएसएस विभागप्रमुख प्रा. कदम, समुपदेशक डॉ. विलास मस्के आदींनी त्यांचे कौतुक केले.
---------------
खेडमध्ये २९ ला आयुर्वेद व्याख्यानमाला
खेडः आयुर्वेद व्यासपीठ संघटनेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा आयुर्वेद व्यासपीठ व येथील रोटरी क्लब यांच्यावतीने २९ ऑक्टोबरला दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत लक्ष्मीनारायण मंदिर देवस्थान येथे आयुर्वेद व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत आयुर्वेदिय दृष्टिकोनातून हृदयरोग, मधुमेह या विषयावर खेडचे सुपुत्र व पुणे येथील वैद्यराज रसिक पावसकर मार्गदर्शन करणार आहेत. या व्याख्यानमालेस बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
----------------
खेडमध्ये १२ हजार७८० जणांना बूस्टर डोस
खेड ः तालुक्यात आत्तापर्यंत १२ हजार ७८० नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. नगर पालिका हद्दीत १४४५, तळे विभागात १६२६, कोरेगाव ८९४, फुरूस १४७६, आंबवली १०५८, लोटे १४३४, शिवबुद्रुक १४७६, तिसंगी १०१८ तर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातंर्गंत १८६ जणांनी बूस्टर घेतला आहे. कोविशिल्डच्या पहिल्या डोसचे ९२ हजार ५२६ तर दुसर्‍या डोसचे ८१ हजार ४५६, कोव्हॅक्सिनच्या पहिल्या डोसचे २५ हजार ४०४ तर दुसर्‍या डोसचे २२ हजार ४६४ नागरिकांचे लसीकरण झाल्याचे सांगण्यात आले. १२ ते १४ वयोगटातील ६६७८ मुलांचे लसीकरण झाले आहे. नगर पालिका हद्दीत ११९२, तळे विभागात ४६९, कोरेगाव ४५३, फुरूस ८९४, आंबवली ११५०, वावे -४५६, लोटे ६३९, शिवबुद्रुक ९८७, तिसंगी ३६४ तर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातंर्गत ७४ मुलांचे लसीकरण झाल्याचे सांगण्यात आले.
-------------------