रत्नागिरी ः काही घडामोडीनंतरच किरण सामंतांची राजकारणात एन्ट्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः काही घडामोडीनंतरच किरण सामंतांची राजकारणात एन्ट्री
रत्नागिरी ः काही घडामोडीनंतरच किरण सामंतांची राजकारणात एन्ट्री

रत्नागिरी ः काही घडामोडीनंतरच किरण सामंतांची राजकारणात एन्ट्री

sakal_logo
By

rat24p1.jpg-
५८४२९
किरण सामंत
---------------

किरण सामंतांची राजकारणात एंट्री ?

जिल्ह्यात पुन्हा राजकीय भूकंप; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी

रत्नागिरी, ता. २४ ः रत्नागिरीच नव्हे तर कोकणचे राजकाराण ढवळून काढणारे आणि राजकीय पडद्यामागील वजीर, किंगमेकर म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते किरण ऊर्फ भैया सामंत यांची लवकरच राजकारणात एंट्री होणार आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील घडामोडींवर त्यांचा राजकारणातील प्रवेश अवलंबून आहे. ही घडमोडदेखील पुन्हा जिल्ह्याच्या राजकारणात भूकंप घडवणारी असेल, असे संकेत मिळत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने ही राजकीय मोर्चेबांधणी सुरू आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांची राजकारणात एंट्री होण्याची शक्यता वाढली आहे. राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर जोरदार राजकीय उलथापालथ झाली. सेनेची यात मोठी पडझड झाली. सेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार एकनाथ शिंदे गटामध्ये सामील झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर झालेल्या अनैसर्गिक युतीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी भाजपशी असलेल्या नैसर्गिक युतीच्यादृष्टीने उचललेले हे पाऊस असल्याचे त्यांचे म्हणणे आहे; मात्र पडझडीतून सावरण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मैदानात उतरावे लागले आहे. सेना सावरण्याचा प्रयत्न करत असताना एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांच्या शिवसेना गटाने राज्यात पाय पसरले आहेत. नुकत्याच झालेल्या राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाला चांगले यश मिळाल्याचा दावा आहे.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधानसभा निवडणुकांचा विचार करून शिंदे गटाने पावलं टाकायला सुरवात केली आहे. किरण सामंत हे राजकारणातील वजीर आणि किंगमेकर म्हणून ओळखले जातात. त्यांची कार्यपद्धत धडाकेबाज आहे. राजकीय बुद्धिबळामध्ये कोणती चाल कधी खेळायची, हे चांगलेच अवगत असते, अशी त्यांची ख्याती आहे. सिंधुरत्न योजनेच्या सदस्यपदी नुकतीच किरण सामंत यांची नेमणूक झाली आहे. गेली अनेक वर्षे किरण सामंत सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र क्रिकेट बोर्डवर ते सदस्य आहेत, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील विकासकामांसाठी ते अहोरात्र प्रयत्न करत असतात. शिंदे गटाची कोकणात मजबूत बांधणी करण्यासाठी किरण सामंत आता राजकारणाच्या मैदानात एंट्री करणार असल्याची शक्यता व्यक्त आहे.
-------------------------------
चौकट
खासदारकीसाठी नावाची चर्चा
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिंदे गटाकडून खासदारकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे; मात्र मेख वेगळीच आहे. जिल्ह्यातील एका मोठ्या अपेक्षित राजकीय घडामोडीवर त्यांची राजकारणातील एंट्री अवलंबून आहे. शिंदे गटाने खेळलेली चाल यशस्वी झाली तर ही एंट्री मागे पडू शकते; मात्र ती अयशस्वी झाली तर किरण सामंतांची राजकारणात दणक्यात एंट्री होणार असल्याचे बोलले जाते.