चिपळूण बाजारपेठेत खरेदीदारांमुळे वाहतूककोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण बाजारपेठेत खरेदीदारांमुळे वाहतूककोंडी
चिपळूण बाजारपेठेत खरेदीदारांमुळे वाहतूककोंडी

चिपळूण बाजारपेठेत खरेदीदारांमुळे वाहतूककोंडी

sakal_logo
By

ratchl२४४.jpg
५८४८९
चिपळूणः खरेदीसाठी बाजारपेठेत झालेली ग्राहकांची रेलचेल.

ratchl२४५.jpg ः
५८४९०
बाजारपेठेत झालेली वाहतूककोंडी.

चिपळूण बाजारपेठेत खरेदीदारांमुळे वाहतूककोंडी
सर्वच दुकानातून गर्दी; पाडव्याला उच्चांक होण्याची शक्यता
चिपळूण, ता. २४ ः दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत लक्षावधींची उलाढाल सुरू आहे. कपडे, फराळ, फटाके, सोने-चांदीच्या वस्तू यांच्यासह मोटारसायकल, चारचाकी गाड्या अशा सर्वच दुकानातून ग्राहकांनी गर्दी केली आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. आता पाडव्यालादेखील खरेदीचा उच्चांक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाजारपेठेतील गर्दीमुळे वाहतूककोंडी होत आहे.
कोरोना महामारीमुळे तसेच गतवर्षी चिपळुणात आलेल्या महापुरामुळे चिपळूणवासीयांची दिवाळी दोन वर्षे थंड होती. यावर्षी मात्र दिवाळी सणाच्या निमित्ताने उत्साह दुणावला आहे. गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला. दसऱ्यालादेखील आनंदाचे भरते आले. आता ऐन दिवाळीत पावसाने विश्रांती घेतल्याने उत्साह संचारला आहे.
शहर बाजारपेठेत खरेदीसाठी गेले पाच दिवस ग्राहकांची दिवस-रात्र झुंबड उडत आहे. कपडे, भांडी, अन्नधान्य, भेटवस्तू, शोभेच्या वस्तू, सोने चांदीचे दागिने, मोबाईल व अॅक्सेसरिज, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, ज्वेलरी, कटलरी, सुगंधी अत्तर, फटाके, रांगोळी, मावळे, आकाश कंदील, गृहोपयोगी वस्तू यांना मोठ्या प्रमाणात मागणी असून बाजारपेठेतील प्रत्येक दुकान गर्दीने फुलून गेली आहेत. या खरेदीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे. त्यामुळे या वर्षीची दिवाळी व्यापाऱ्यांसाठी आनंददायी आहे. चिपळुणात बाजारपेठ जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. गतवर्षी महापुरामुळे ही बाजारपेठ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. मात्र, अवघ्या तीन महिन्यात येथील व्यापारी सावरला आणि लगेच आलेला गणेशोत्सव, दसरा, दिवाळीसाठी व्यापाऱ्यांनी दुकान सज्ज ठेवली. मात्र, यावर्षी व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात मोठ्या प्रमाणात माल भरला आहे. विशेष म्हणजे यावर्षी पूर न आल्याने व्यापाऱ्यांमध्ये मोठा उत्साह असून खरेदीसाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
---------------------
चौकट
पावसामुळे बाजारपेठेत वर्दळ कमी
दिवाळी सुरू होण्याच्या आधीच्या काळातील काही दिवस पावसामुळे बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ कमी होती. मात्र, गेले तीन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढली. सकाळी ९.३० वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळत असून पोलिस बंदोबस्तदेखील आहे.