मोरे आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोरे आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता
मोरे आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता

मोरे आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता

sakal_logo
By

मोरे आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार
पोलिसांनी कॉल डिटेल्स मागवले; आत्महत्येचे गूढ कायम
रत्नागिरी, ता. २४ ः शहराजवळच्या जे. के. फाईल्स साईभूमीनगर येथे मैत्रिणीच्या फ्लॅटवर मृतदेह आढळून आलेल्या साहिल मोरे याच्या आत्महत्येचे गूढ कायम आहे. पोलिसांनी साहिलसह त्याच्या मैत्रिणीचे कॉल डिटेल्स मोबाईल कंपनीकडून मागवले असून दोघांचेही मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. यातून काही महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्याच्यादृष्टीने पोलिसांनी हालचाल सुरू केली आहे.
साहिल विनायक मोरे (२२, रा. अलावा रत्नागिरी) या तरुणाने २१ ऑक्टोबर २०२२ ला साईभूमीनगर येथे मैत्रिणीच्या फ्लॅटवर आत्महत्या केल्याचा प्रकार पुढे आला. या वेळी साहिल याच्या मैत्रिणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, साहिल याने गळफास घेताना तो रूममध्ये एकटाच होता तर मैत्रीण ही इमारतीखाली त्याची वाट पाहत होती. बराच वेळ निघून गेल्यानंतर तिने साहिल याच्या मोबाईलवर कॉल करण्याचा प्रयत्न केला; मात्र साहिल याने तिच्या कॉलला उत्तर दिले नाही. अखेर मैत्रीण पुन्हा फ्लॅटवर गेली तेव्हा साहिल हा किचनमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. साहिल याने गळफास घेतलेला पाहून मैत्रिणीने साहिलच्या बहिणीला फोन केला तसेच आपल्या मित्रालाही फोन केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे; मात्र मैत्रिणीने घटनेच्या अगोदर व नंतर कुणाला फोन कॉल केले होता का, याची माहिती घेण्यासाठी मागील ६ महिन्यांचे कॉल डिटेल्स पोलिसांकडून मागवण्यात आले आहेत. त्यातून या घटनेविषयी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. घटनेच्या दिवशी पोलिसांनी साहिल याच्या मैत्रिणीच्या फ्लॅटची पूर्ण तपासणी केली. घटनास्थळावरून पोलिसांना साहिल याचा मोबाईल सापडला. या मोबाईलमधून काही माहिती मिळते का, याबाबत पोलिस तपास करत आहेत. साहिल कुणाच्या संपर्कात होता याबाबत पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. यासाठी साहिलच्याही मोबाईलचे कॉल डिटेल्स मागवण्यात येत आहेत. साहिलच्या मृत्यू प्रकरणाचा कसून तपास करण्यात यावा, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.