अभिषेकी रंग दिवाळी पाडवा मैफल उद्या रंगणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिषेकी रंग दिवाळी पाडवा मैफल उद्या रंगणार
अभिषेकी रंग दिवाळी पाडवा मैफल उद्या रंगणार

अभिषेकी रंग दिवाळी पाडवा मैफल उद्या रंगणार

sakal_logo
By

rat२४p३१.jpg-
५८४८१
राधिका ताम्हणकर, अभिजित भट, विशारद गुरव

अभिषेकी रंग दिवाळी पाडवा मैफल उद्या रंगणार
खल्वायन ; राधिका विशारद, अभिजित हे खास आकर्षण
रत्नागिरी, ता. २४ः दोन वर्षांच्या खंडानंतर खल्वायन संस्थेची दिवाळी पाडवा मैफल रंगणार आहे. गायक, संगीतकार (कै.) पं. जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेली व गायन करून अजरामर केलेली अभंग, नाट्यपदे या मैफलीत सादर होणार आहेत. बुधवारी (ता. २६) सायंकाळी ५ ते ७ या वेळेत गुरूकृपा मंगल कार्यालयात मैफल होणार आहे. पुण्याची गायिका राधिका ताम्हणकर, चिपळूणचा विशारद गुरव व रत्नागिरीचा गायक अभिजित भट गायन कौशल्यातून अभिषेकी बुवांच्या रचनांना न्याय देणार आहेत.
मैफलीदरम्यान निवेदिका पूर्वा पेठे आपल्या निवेदन कौशल्यातून पं. अभिषेकी यांचा सांगितिक प्रवास रसिकांसमोर उलगडणार आहेत. राधिका ताम्हणकर यांनी एमए (संगीत) ही पदवी प्राप्त केली आहे. पं. जितेंद्र अभिषेकींचे पट्टशिष्य पं. हेमंत पेंडसे यांच्याकडे त्यांच्या गायनाचे शिक्षण सुरू आहे. विदुषी देवकी पंडित यांच्याकडूनही त्यांना काही काळ मार्गदर्शन मिळालेले आहे. गायक विशारद गुरव याचे सुरवातीचे शास्त्रीय गायनाचे शिक्षण महेशकुमार देशपांडे यांच्याकडे व त्यानंतरचे शिक्षण जयपुर घराणे गायकीचे प्रसिद्ध गायक व आकाशवाणी कलावंत प्रसाद गुळवणी यांच्याकडे सुरू आहे. संगीत सुवर्णतुला नाटकासाठी उत्कृष्ट गायक नट म्हणून महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धेमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या रायस्तरीय (कै.) राम मराठे जोड राग गायन स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे.
तिसरे गायक अभिजित भट यांचे शास्त्रीय गायनाचे सुरवातीचे शिक्षण संध्या सुर्वे व नंतरचे शिक्षण जयपूर घराणे गायकीचे प्रसिद्ध गायक व आकाशवाणी कलावंत प्रसाद गुळवणी यांच्याकडे सुरू आहे. संगीत नाटकांतूनही त्याने आपल्या गायन कौशल्याचा ठसा उमटवला आहे. भावगीते व मराठी सिनेगीते गाण्यातही त्याचा हातखंडा आहे. या मैफलीला वादक रामकृष्ण करंबेळकर तबलासाथ, वरद सोहनी ऑर्गनची साथ आणि उदय गोखले हे व्हायोलिनची साथ करणार आहेत. संगीत रसिकांनी मैफलीला उपस्थित राहून दीपावलीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन संस्था अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.