कसवणमध्ये ३० जणांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसवणमध्ये ३० जणांचे रक्तदान
कसवणमध्ये ३० जणांचे रक्तदान

कसवणमध्ये ३० जणांचे रक्तदान

sakal_logo
By

कसवणमध्ये ३० जणांचे रक्तदान
कणकवली ः जीवन आधार आरोग्यसेवा संस्था कसवण-तळवडे यांच्यातर्फे पूर्ण प्राथमिक शाळा क्र. २ कसवण येथे घेण्यात आलेल्या शिबिरात ३० दात्यांनी रक्तदान केले. समाजहित लक्षात घेऊन मंडळाकडून सातत्याने असे उपक्रम राबविताना ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत विविध सुविधा पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे, असे प्रशांत सावंत यांनी सांगितले. प्रशांत सावंत, सखाराम घाडीगावकर, श्यामसुंदर मालंडकर, सीताराम तेली, बाबू वायंगणकर, संतोष मेस्त्री, प्रकाश तेली, एकनाथ राऊळ, मस्की फर्नांडिस, यशोधन सर्पे, गंगाराम राऊळ, सर्व शिक्षक वर्ग, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामधील डॉक्टर, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
-----------
कसाल पुलाखाली खड्डे
ओरोस ः कसाल बस स्थानकासमोर सर्व्हिस रस्ता आणि पुलाखालील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांचा अंदाज येत नसल्याने तसेच यात पाणी साचून राहत असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली. आहे. तेथील खड्डे तत्काळ बुजविण्यात यावेत, अशी मागणी कसाल पंचक्रोशीतील नागरिक आणि वाहनधारकांकडून केली जात आहे.
-----------
''मदर क्विन्स''चे
नेत्रदीपक यश
सावंतवाडी, ता. २४ ः सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्विन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. पाचवीतील आयडन कालो, हर्षद धारगळकर, योगीराज दुभाषी, देवेश गावडे, विजय कोरगावकर, नॉर्विन मेनेजीस, गौरांग पेडणेकर, यशराज राउळ सावंत यांनी यश मिळविले.
---------------
निबंध स्पर्धेत
सुरुचीचे यश
वेंगुर्ले, ता. २४ ः तुळस येथील श्री शिवाजी हायस्कूलच्या मुलांनी विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले. गटशिक्षणाधिकारी वेंगुर्ले व जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग आयोजित सहावी ते आठवी गटामध्ये सुरुची मराठे हिने ''पर्यावरण संवर्धन काळाची गरज'' या निबंध स्पर्धेत वेंगुर्ले तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळविला.
--------------
तळेबाजार येथे
शेतकऱी मेळावा
देवगड, ता. २४ ः भाकरवाडी युवक क्लब तळवडे या मंडळाच्यावतीने तळेबाजार येथील ज्ञानसंपदा ज्युनिअर कॉलेजमध्ये मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन तळवडे येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार विनायक शेठ धुरी यांच्या हस्ते झाले. या मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला.
...............