मुरादपूर ते कळकदरापर्यंतचा रस्ता तत्काळ पूर्ण करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरादपूर ते कळकदरापर्यंतचा रस्ता तत्काळ पूर्ण करा
मुरादपूर ते कळकदरापर्यंतचा रस्ता तत्काळ पूर्ण करा

मुरादपूर ते कळकदरापर्यंतचा रस्ता तत्काळ पूर्ण करा

sakal_logo
By

मुरादपूर ते कळकदरापर्यंतचा
रस्ता तत्काळ पूर्ण करा
रत्नागिरी, ता. २५ः संगमेश्वर तालुक्यातील मुरादपूरनाका ते कळकदरापर्यंतच्या रस्त्याचे प्रस्तावित काम लवकरात लवकर पूर्ण करून होणारी जीवितहानी टाळावी, अशी मागणी ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय जॉइंट सेक्रेटरी गणपत कदम यांनी केली
आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांना या संदर्भातील मागणीचे निवेदन गणपत कदम यांनी दिले. रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झाला आहे. प्रवासी, मालवाहतूकदारांना जीव मुठीत धरून नेहमी प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावरून आजारी माणसांना, गरोदर महिलांना ये-जा करणे शक्य नाही. अपघाताचे प्रमाण वाढल्याने रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. अनेक नागरिकांना नाहक आपले जीव गमवावे लागत आहेत. भविष्यात हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. रस्ता नूतनीकरणाबाबत कार्यकारी अभियंत्यांनी स्वतः लक्ष घालावे. रस्त्याचे नूतनीकरण पूर्ण करून नागरिकांची होणारी जीवितहानी टाळावी, असे गणपत कदम यांनी बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.