चौकुळमध्ये रुग्णवाहिकेतच झाली महिलेची प्रसुती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौकुळमध्ये रुग्णवाहिकेतच झाली महिलेची प्रसुती
चौकुळमध्ये रुग्णवाहिकेतच झाली महिलेची प्रसुती

चौकुळमध्ये रुग्णवाहिकेतच झाली महिलेची प्रसुती

sakal_logo
By

चौकुळमध्ये रुग्णवाहिकेतच झाली महिलेची प्रसुती
सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. २५ : चौकुळ-चुरणीची मुस येथील एका महिलेची प्रसुती १०८ रुग्णवाहिकेतच झाली. त्या महिलेला मुलगा झाला असून दोघांनावर यशस्वीरित्या डॉ. रितेश बोंडे यांनी रुग्णवाहिकेत उपचार केले. रुग्णवाहिका चालक अर्जुन राऊत यांनीही याकामी मदत केली.
अधिक माहिती अशी की, काल (ता. २४) रात्री चौकुळ चुरणीची मुस येथील जयश्री जगू कोकरे (वय २६) या महिलेस प्रसुतीच्या कळा आल्यानंतर १०८ क्रमांकावर रुग्णवाहिका बोलाविण्यात आली. आंबोलीतील रुग्णवाहिका चालक अर्जुन राऊत आणि डॉ. रितेश बोंडे यांनी तातडीने धाव घेत घेतली. महिलेला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणताना वाटेतच प्रसुती वेदना सुरू होऊन तिची प्रसुती झाली. डॉ. बोंडे यांनी उपचार करून प्रसुती यशस्वी केली. त्यांना आंबोली आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती ठीक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत ग्रामस्थांनी डॉ. बोंडे आणि चालक राऊत यांचे आभार मानले.