आयोडीनयुक्त मिठाचा वापर करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयोडीनयुक्त मिठाचा वापर करा
आयोडीनयुक्त मिठाचा वापर करा

आयोडीनयुक्त मिठाचा वापर करा

sakal_logo
By

आयोडीनयुक्त मिठाचा वापर करा
डॉ. आठल्ये; आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम
रत्नागिरी, ता. २५ः मीठ हे शक्ती आणि बुद्धीचे रक्षक असून आयोडीनयुक्त मिठाचा रोजच्या आहारात वापर करणे फायदेशीर आहे. आयोडीनचे दररोज सेवन तुम्हाला तंदुरुस्त ठेवते. त्याचप्रमाणे शारीरिक वाढ आणि विकास, शरीरातील चयापचय, नियमन इष्टतम मानसिक विकास, शरीरात उष्णता निर्माण करणे आणि शरीराचे तापमान राखते. आपली भावी पिढी तसेच गरोदर माता शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आयोडीनयुक्त मिठाचा वापर करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले.
राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाला. आयोडीनच्या अभावामुळे गलगंड, मूकबधिरता, अपंगत्व व मतिमंदता, जन्मतः व्यंगत्व हे आजार होतात. या आजारांची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तसेच अधिक माहितीकरिता आशा, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी केले आहे. मंडणगड, दापोली, खेड, गुहागर व चिपळूण या पाच तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी यांची सभा घेऊन राष्ट्रीय कामांचा आढावा घेण्यात आला. या वेळी तालुका आरोग्य अधिकारी चिपळूण डॉ. ज्योती जाधव, तालुका आरोग्य अधिकारी गुहागर डॉ. घनश्याम जांगीड, वैद्यकीय अधिकारी डॉ. यतीन मयेकर, आरोग्य पर्यवेक्षक राजेंद्र रेळेकर, जिल्हा मुल्यमापन व सनियंत्रण अधिकारी प्रकाश पडगे, आरोग्य पर्यवेक्षक स्वप्नील चव्हाण, आरोग्य सहाय्यक मनोहर तायडे उपस्थित होते.