सावंतवाडीमध्ये काँग्रेसतर्फे ‘सेल्फी विथ आकाशकंदील’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीमध्ये काँग्रेसतर्फे
‘सेल्फी विथ आकाशकंदील’
सावंतवाडीमध्ये काँग्रेसतर्फे ‘सेल्फी विथ आकाशकंदील’

सावंतवाडीमध्ये काँग्रेसतर्फे ‘सेल्फी विथ आकाशकंदील’

sakal_logo
By

सावंतवाडीमध्ये काँग्रेसतर्फे
‘सेल्फी विथ आकाशकंदील’

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः तालुका राष्ट्रीय काँग्रेसतर्फे दिवाळीनिमित्त रविवारी (ता. ३०) दीपावली शो टाईमचे आयोजन केले आहे. याअंतर्गत सावंतवाडी तालुका मर्यादित भव्य रांगोळी स्पर्धा व ‘सेल्फी विथ आकाशकंदील’ स्पर्धेचे आयोजन केले असून या दोन्ही स्पर्धांमध्ये स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले आहे.
रविवारी सकाळी १० वाजता आरपीडी हायस्कूलच्या सभागृहात रांगोळी स्पर्धा घेतली जाणार आहे. ही स्पर्धा महिला व मुलींसाठी आहे. स्पर्धकांनी रांगोळी व रंग स्वतः आणावेत. प्रथम क्रमांकास १५५१ रुपये, द्वितीय ७७७ रुपये, तृतीय ५५५ रुपये व उत्तेजनार्थ ३३३ रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. नावनोंदणीसाठी जास्मिन लक्ष्मेश्वर, अमिदी मेस्त्री, सुजिता गावडे यांच्याशी संपर्क साधावा. ''सेल्फी विथ आकाशकंदील'' स्पर्धेत आकाशकंदील इको-फ्रेंडली असावा. आकाशकंदीलसोबत स्पर्धकाचा एक मिनिटाचा व्हिडीओ (मोबाईल आडवा धरून) सभोवताली काढावा. आकाशकंदीलसोबत स्पर्धकाने काढलेले दोन फोटो असावेत. स्पर्धकांनी गुरुवारपर्यंत (ता. २७) व्हिडिओ आनंद कुभार, रुपेश आईर किंवा संतोष सावंत यांच्याकडे पाठवावेत. प्रथम १५५१ रुपये, द्वितीय ७७७ रुपये, तृतीय ५५५ रुपये व उत्तेजनार्थ ३३३ रुपये व प्रमाणपत्र अशी पाच बक्षिसे देण्यात येणार आहेत.