सावंतवाडीत आढळली पांढरी चिचुंद्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत आढळली पांढरी चिचुंद्री
सावंतवाडीत आढळली पांढरी चिचुंद्री

सावंतवाडीत आढळली पांढरी चिचुंद्री

sakal_logo
By

58621
‘अल्बिनो’ चिचुंद्री

सावंतवाडीत आढळली पांढरी चिचुंद्री

दुर्मिळ ‘अल्बिनो’; जनुकीय बदलामुळे रंग बदलला

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः शहरातील खासकीलवाडा येथील वटसावित्री देवस्थानच्या परिसरात दुर्मिळ मानली जाणारी पांढरी ‘अल्बिनो चिचुंद्री’ आढळली. प्राणी-पक्षीमित्र अमित नाईक यांना ती दिसली. त्यांनी हा आगळावेगळा दिसणारा प्राणी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. सिंधुदुर्गातील ही पहिलीच घटना असून शरीरात घडणाऱ्या जनुकीय बदलांमुळे त्यांचा रंग बदलतो, असे प्राणिशास्त्र विभागाचे अभ्यासक डॉ. गणेश मर्गज यांनी सांगितले.
येथील खासकीलवाडा भागात वटसावित्री देवस्थाननजीक असलेल्या रस्त्यावरील गवतात काल (ता. २४) रात्री साडेअकराच्या सुमारास ही चिचुंद्री आढळली. वेगळे काही तरी असल्याचे लक्षात येताच त्या ठिकाणी असलेले नाईक व त्यांचे सहकारी तुषार होडावडेकर, ऑल्विन पिन्टो आणि गौरव हळदणकर आदींनी आपल्या मोबाईलमध्ये तिची छबी टिपली व तिला नैसर्गिक अधिवासात जाऊ दिले.
--
कोट
अशा प्रकारची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिलीच आहे. हा प्राणी दुर्मिळ आहे. ब्लॅक पँथर, पांढरा रेडा किंवा पांढरा उंदीर या प्राण्यांप्रमाणे या चिचुंद्रीच्या शरीरात जनुकीय बदल झाल्यामुळे हा प्रकार होऊ शकतो.
- डॉ. मर्गज, अभ्यासक, प्राणिशास्त्र विभाग