चिपळूण ः सुभाष पाकळे प्रतिष्ठानकडून धावपटू साक्षी जड्याळचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः सुभाष पाकळे प्रतिष्ठानकडून धावपटू साक्षी जड्याळचा गौरव
चिपळूण ः सुभाष पाकळे प्रतिष्ठानकडून धावपटू साक्षी जड्याळचा गौरव

चिपळूण ः सुभाष पाकळे प्रतिष्ठानकडून धावपटू साक्षी जड्याळचा गौरव

sakal_logo
By

rat२५p२१.jpg
५८६४१
चिपळूण ः साक्षी जड्याळ हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्यावर तिचा गौरव करताना सचिन पाकळे, संजय पाकळे सोबत विजय गुजर, संतोष खैर, समीर काझी.

सुभाष पाकळे प्रतिष्ठानकडून
धावपटू साक्षी जड्याळचा गौरव
चिपळूण, ता. २५ ः साक्षी जड्याळ कुडपमधील सर्वसामान्य कुटुंबातील डेरवण व्हीजेसीटीमधील धावपटू असून तिची २९ सप्टेंबर २२ ला झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमधून महाराष्ट्रातून दुसऱ्या स्थानावर राष्टीय स्तरावर निवड झाली आहे. ११ ते १५ ला गुवाहाटी येथे राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी तर फेब्रुवारी २०२३ ला होणाऱ्या ऑल इंडिया स्पर्धेसाठी निवड निश्चित झाली आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील युवती खेळाडू साक्षी संजय जड्याळ हिचा गौरव करत सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक मदतीचा हात देत सुभाष पाकळे प्रतिष्ठानच्यावतीने सचिन पाकळे यांनी या युवती खेळाडूंचा गौरव केला. कुडप गावातील या तरुणीने सावर्डे येथील सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या स्व. गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पहिली ते १२ पर्यंतचे शिक्षण घेतले असून ती वयाच्या १३ व्या वर्षापासून क्रीडाक्षेत्रातील प्रशिक्षणाचे धडे व्हीजेसीटी डेरवण स्पोर्ट अॅकॅडमी येथे घेत आहे. ती अनवाणी पायाने धावण्याचा सराव करत असताना अध्यक्ष सचिन पाकळे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ अपरिचित साक्षी हिची जिद्द पाहून तिला स्पोर्टशूजची व्यवस्था करून दिली. भविष्यात स्पर्धेसाठी मदत करण्याचा संकल्प केला.
दरवर्षी सातत्याने ही मदत सुभाष पाकळे प्रतिष्ठान करत आहेत. साक्षीच्या कुटुंबाच्या बेताची परिस्थिती असताना न डगमगता जिद्द, हुशार, चिकाटीच्या आधारावर साक्षीनं विभागीय, तालुका, जिल्हा व आता राज्यस्तरावरून एकेक टप्प्यावर यश संपादित करत राष्ट्रीय स्तरावर मजल मारली आहे. १२वीनंतरच शिक्षण आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने पदवी शिक्षण एसएसटी कॉलेज, उल्हासनगर यांच्या येथे प्रवेश मिळवून कोणतेही खासगी क्लास न घेता स्वतः अभ्यास करून बाहेरून परीक्षा देत आहे. सध्या ती एफवायबीएचे शिक्षण घेत आहे.

चौकट
२४ पदकांची कमाई
साक्षीने आपल्या बेताच्या आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता गेल्या सात वर्षात जिद्दीने क्रीडांगणार धावत ९ सुवर्ण, ११ रौप्य तर ४ कांस्य अशी एकूण २४ पदकांची कमाई केली आहे.