आकाशकंदीलात कोयडे, सारंग प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आकाशकंदीलात कोयडे, सारंग प्रथम
आकाशकंदीलात कोयडे, सारंग प्रथम

आकाशकंदीलात कोयडे, सारंग प्रथम

sakal_logo
By

58657
देवगड ः आकाशकंदील प्रदर्शनाचे उद्‍घाटन करताना बाबाजी कांबळी. शेजारी दत्तात्रय जोशी आदी.

तन्मय कोयडे, सारंग प्रथम

देवगडची आकाशकंदील स्पर्धा; उमाबाई बर्वे ग्रंथालयाचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २५ ः उमाबाई बर्वे ग्रंथालयातर्फे दिवाळीनिमित्त आयोजित आकाशकंदील स्पर्धेतील लहान गटात तन्मय कोयडे तर खुल्या गटात दत्तप्रसाद सारंग यांनी प्रथम क्रमांक मिळविला. आकाशकंदील प्रदर्शनाचे उद्‍घाटन येथील बांधकाम व्यावसायिक आणि ग्रंथालयाचे देणगीदार बाबाजी कांबळी यांच्या हस्ते झाले. यावेळी कांबळी यांनी विविध आकाराचे व रंगाचे आकाश कंदील बनवून आणलेल्या स्पर्धकांचे कौतुक केले.
ग्रंथालयातर्फे दिवाळीनिमित्त आकाश कंदील स्पर्धा तसेच कंदील प्रदर्शनाचे आयोजन केले होते. स्पर्धा शालेय गट व खुला गट अशा दोन गटांमध्ये झाली. तर ग्रंथालयातर्फे दिवाळी अंकाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्‍घाटन ग्रंथालयाचे देणगीदार आणि बागायतदार सुहास पाटणकर यांनी केले. त्यांनी ग्रंथालय राबवित असलेल्या दिवाळी अंक योजना उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमावेळी मंचावर बाबाजी कांबळी, सुहास पाटणकर यांच्यासह किरण पांचाळ, अनुश्री पारकर, ग्रंथालयाचे संचालक सदस्य एस. एस. पाटील, दत्तात्रय जोशी उपस्थित होते. पाटील आणि जोशी यांनी मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली. किरण पांचाळ आणि अनुश्री पारकर यांनी परीक्षण केले. ग्रंथालयाचे सचिव संजय धुरी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
..................
चौकट
स्पर्धा निकाल
आकाश कंदील स्पर्धेतील शालेय गटात अनुक्रमे तन्मय राजेंद्र कोयडे, सुयश सुदेश गोलतकर, दुर्वा प्रमोद चांदोस्कर यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले. तर तनिष्का आंबळकर हिला उत्तेजनार्थ मिळाला. तर खुल्या गटामध्ये अनुक्रमे दत्तप्रसाद सारंग, राज चांदोस्कर, चारुलता तारकर यांना पहिले तीन क्रमांक, तर दशरथ शेलटकर यांना उत्तेजनार्थ देण्यात आला.