समाजाभिमुख उपक्रम राबवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाजाभिमुख उपक्रम राबवा
समाजाभिमुख उपक्रम राबवा

समाजाभिमुख उपक्रम राबवा

sakal_logo
By

58658
वेंगुर्ले ः हॉस्पिटल नाका येथील ‘दीपावली शो टाईम’चे उद्‍घाटन करताना बाळू देसाई.

समाजाभिमुख उपक्रम राबवा

प्रसन्ना देसाई ः वेंगुर्लेत दीपावली शो टाईमचे उद्घाटन

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २५ ः मंडळाने रक्तदान व आरोग्यासारखे समाजाभिमुख उपक्रम राबवावेत. मंडळाला तालुक्यातील एक आदर्श मंडळ म्हणून नावलौकिक मिळेल, असे कार्य मंडळाच्या हातून घडावे, अशी अपेक्षा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी व्यक्त केली.
येथील हॉस्पिटल नाका कला-क्रीडा मंडळातर्फे २४ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत ‘दीपावली शो टाईम’चे आयोजन केले असून याचे उद्‍घाटन काल (ता. २४) भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, माजी नगरसेवक विधाता सावंत व ज्येष्ठ व्यापारी अशोक ठोंबरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार गवस, उपाध्यक्ष अॅड. मनीष सातार्डेकर, सामाजिक कार्यकर्ते दिनेश तानावडे, प्रशांत नेरुरकर, सुरेंद्र चव्हाण, शाम कौलगेकर, प्रणव वायंगणकर, भूषण सारंग, मनीष परब यांच्यासह राहूल वेंगुर्लेकर, आनंद कळेकर, महेंद्र गावडे, रामचंद्र सावंत, जयंत सावंत, मनीष कळेकर, प्रफुल्ल सावंत, सिद्धेश मांजरेकर, रुपेश सावंत, सचिन मांजरेकर, सौरभ भोसले, ऋतिक गवस, कौस्तुभ मयेकर, परमानंद नार्वेकर, अॅड. प्रकाश बोवलेकर, प्रशांत गावडे, करण निरावडेकर, आसिफ खान, निखिल शिरोडकर, तेजस कुडाळकर, खुशाल निरावडेकर, मुकुल सातार्डेकर, शशांक मडकईकर, मकरंद होळकर, सुभाष सोनुर्लेकर, तेजस धुरी, अद्वैत बोवलेकर, कौस्तुभ गवस, जितेंद्र धुमक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश गोवेकर यांनी केले. उद्‍घाटन कार्यक्रमानंतर दांडिया आणि फुगड्या सादर करण्यात आल्या. दरम्यान, उद्या (ता. २६) सकाळी धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी सातला दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळाचा ‘किमिच्छक्र व्रत’ हा नाट्यप्रयोग, २७ ला सायंकाळी सातला खास महिलांसाठी ‘होममिनिस्टर’, असे कार्यक्रम होणार आहेत.