सूर्यग्रहण पाहण्याची संधी कणकवलीमध्ये हुकली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सूर्यग्रहण पाहण्याची संधी 
कणकवलीमध्ये हुकली
सूर्यग्रहण पाहण्याची संधी कणकवलीमध्ये हुकली

सूर्यग्रहण पाहण्याची संधी कणकवलीमध्ये हुकली

sakal_logo
By

58648
कणकवली ः ढगाळ वातावरणानंतर अस्ताला जाणाऱ्या सूर्याचे झालेले दर्शन.

सूर्यग्रहण पाहण्याची संधी
कणकवलीमध्ये हुकली

ढगाळ वातावरणामुळे अडथळे

कणकवली,ता. २५ ः या वर्षातील अखेरचे सूर्यग्रहण पाहण्याची कणकवली आणि परिसरातील लोकांची संधी हुकली. सूर्य अस्ताला जात असताना ढगाळ वातावरणामुळे काही काळ सूर्याचे दर्शन होऊ शकले नाही. ग्रहणाच्या काळात निवडक लोकांना ज्यांच्याकडे ग्रहण पाहण्यासाठी आवश्यक ते साहित्य होते. अशांना ती संधी मिळाली; मात्र, सर्वसामान्यांना ग्रहण पाहण्याची संधी मिळाली नाही.
देशभरात आजच्या सूर्यग्रहणाची उत्सुकता सर्वांना लागली होती. आज पहाटेपासून सूर्यग्रहणाच्या वेदाला सुरुवात झाली होती. परतीच्या पावसाने उसंत घेतल्यानंतर आज सकाळपासून आभाळ स्वच्छ होते; पण, दुपारनंतर पुन्हा हळूहळू ढग जमा होऊ लागले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास पश्चिम दिशेला सूर्य अस्ताकडे जात असताना, वातावरण ढगाळ होऊ लागले होते. त्यामुळे काहींना सूर्यग्रहणाचा अनुभव घेता आला नाही. मात्र, ज्यांच्याकडे सूर्यग्रहण पाहण्यासाठी खगोलशास्त्राच्या नियमाप्रमाणे साहित्य होते अशांना ती संधी मिळाली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अर्धसूर्यकृतीचे ग्रहण दिसून येत होते. सूर्यास्ताच्या काही कालावधीत वातावरण निवळेपर्यंत काहींना ग्रहण पाहता आले; पण, बहुतांश परिसरात ढगाळ वातावरण असल्याने सूर्यग्रहण पाहता आले नाही. विशेष म्हणजे सूर्यग्रहणाच्या कलावधीत नागरिक रस्त्यावर फिरत होते. यापुर्वीची ग्रहणाभाबतची भीती किंवा अंधश्रद्धा नव्या पिढीमध्ये फारशी राहिलेली नाही. शिकलेल्या पिढीने याला सूर्यग्रहणाला वैज्ञानिक दृष्टीतून पाहिले. खगोलशास्त्रांच्या अभ्यासकांना मात्र, सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळाली.