कणकवली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा नोव्हेंबरमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली तालुकास्तरीय 
क्रीडा स्पर्धा नोव्हेंबरमध्ये
कणकवली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा नोव्हेंबरमध्ये

कणकवली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा नोव्हेंबरमध्ये

sakal_logo
By

कणकवली तालुकास्तरीय
क्रीडा स्पर्धा नोव्हेंबरमध्ये
कणकवली, ता. २५ ः येथील तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून यंदा १५ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर पर्यंत या स्पर्धा होणार आहेत. तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांच्या मैदानावर स्पर्धांचे आयोजन केले आहे. तहसीलदार रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या क्रीडा समितीच्या बैठकी शालेय क्रीडा स्पर्धेच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्यात आले. या स्पर्धा १४ ते १९ वयोगटामध्ये होणार आहेत.
नियोजनानुसार १५ नोव्हेंबरला बुद्धिबळ स्पर्धा विद्यामंदिर हायस्कूल येथे होईल. तसेच १७ नोव्हेंबरला फुटबॉल स्पर्धा कणकवलीच्या मुडेश्वर मैदानावर होणार आहे. क्रिकेट स्पर्धा १९ नोव्हेंबरला मुडेश्वर मैदानावर होईल. हॉलीबॉल स्पर्धा २२ नोव्हेंबरला आयडिया इंग्लिश स्कूल येथे होणार आहे. तसेच २४ नोव्हेंबरला तायक्वांदो स्पर्धा जानवली येथील बाल शिवाजी हायस्कूलमध्ये होणार आहे. कबड्डी स्पर्धा २८ आणि २९ नोव्हेंबरला फोंडाघाट हायस्कुलच्या मैदानावर होणार आहे. कनेडी हायस्कूल येथे दोन आणि तीन डिसेंबरला खो-खो स्पर्धा होईल. तर ५ डिसेंबरला कॅरम स्पर्धा ल.गो. सामंत विद्यालयात होणार आहे. कुस्ती स्पर्धा ८ डिसेंबरला कासार्डे हायस्कूल येथे नियोजित आहे. तसेच मैदानी विविध स्पर्धा १५ ते १७ डिसेंबरला कणकवलीच्या मुडेश्वर मैदानात आयोजित करण्यात आली आहे. क्रीडा समन्वय परिषद आणि गटविकास अधिकारी यांच्यातर्फे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.