संगमेश्वर - पाटण घाटमार्ग लोकचळवळीचे काम प्रभाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगमेश्वर - पाटण घाटमार्ग लोकचळवळीचे काम प्रभाव
संगमेश्वर - पाटण घाटमार्ग लोकचळवळीचे काम प्रभाव

संगमेश्वर - पाटण घाटमार्ग लोकचळवळीचे काम प्रभाव

sakal_logo
By

rat२५p१८.jpg
५८६३८
संगमेश्वरःसंगमेश्वर-पाटण घाटमार्ग लोकचळवळीबाबत किरण सामंत याना माहिती देऊन पुस्तिका सादर करताना समन्वय समितीचे समन्वयक संतोष येडगे आणि सहकारी.

संगमेश्वर-पाटण घाटमार्ग प्रभावी लोकचळवळ
किरण सामंत यांचा पाठींबा; शासन दरबारी सक्षमपणे पाठपुराव्याची ग्वाही
संगमेश्वर, ता. २५ः संगमेश्वर-पाटण घाटमार्ग लोकचळवळीचे काम प्रभावी असून घाटमार्ग काम मार्गी लागण्यासाठी शासन दरबारी सक्षमपणे पाठपुरावा करणार अशी ग्वाही सामाजिक कार्यकर्ते किरण सामंत यानी दिली. सामंत हे राजकारणात थेट प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असताना त्यानी या महत्वाच्या मुद्यावर शब्द दिल्याने या लाकचळवळीला हुरूप आला आहे.
संगमेश्वर-पाटण घाटमार्ग समन्वय समितीचे समन्वयक संतोष येडगे यांनी रत्नसिंधू समृद्ध योजनेचे सदस्य तथा उद्योजक किरण सामंत यांची भेट घेत या लोकचळवळीबद्दल सविस्तर माहिती दिली. या लोकचळवळीचे कौतुक करत या कामी आपण शासन दरबारी सक्षमपणे पाठपुरावा करून काम मंजूर करून घेऊ, असे आश्वासन किरण सामंत यांनी दिले. संगमेश्वर-पाटण घाटमार्ग काम मार्गी लागावे म्हणून संगमेश्वर-पाटण घाटमार्ग समन्वय समितीचे समन्वयक संतोष येडगे यांनी लोकचळवळ उभी केली आहे. या लोकचळवळीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून घाटमार्गाचे काम लवकर सुरू व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घाटमार्गाविषयी लोकचळवळीच्या माध्यमातून सध्या प्रभावीपणे सह्या मोहीम राबवली जात आह. याच पार्श्वभूमीवर
या घाटमार्ग कामाचे ७ मे १९९९ ला तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले होते. संगमेश्वर ते चाफेर (पाटण) हा एकूण ४६.६०० कि.मी.चा रस्ता आहे. यापैकी २६.६०० कि.मी. एकेरी रस्ता तयार असून फक्त २० कि.मी. रस्ता तयार करावा लागणार आहे. रत्नागिरी जिल्हा हद्दीतील ५.५०० कि.मी. तर सातारा जिल्हा हद्दीतील १४.६०० कि.मी. अंतरामधील रस्ता शिल्लक आहे. या कामाला तातडीने मंजुरी मिळण्यासाठी शासनदरबारी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
या घाटमार्ग समन्वय समितीचे समन्वयक येडगे यांनी रत्नसिंधू समृद्ध योजनेचे सदस्य तथा उद्योजक किरण सामंत यांना संगमेश्वर-पाटण घाटमार्ग कामाच्या सह्या मोहिमेची पुस्तिका सादर करत कामाच्या तांत्रिक बाबी लक्षात आणून दिल्या. या वेळी रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य तुकाराम येडगे, दीपक येडगे, बाबू पवार उपस्थित होते.