साडवली येथील रस्त्यावरील खड्डे न भरल्यास रास्ता रोको आंदोलन ः प्रद्युम्न माने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडवली  येथील रस्त्यावरील खड्डे न भरल्यास रास्ता रोको आंदोलन ः प्रद्युम्न माने
साडवली येथील रस्त्यावरील खड्डे न भरल्यास रास्ता रोको आंदोलन ः प्रद्युम्न माने

साडवली येथील रस्त्यावरील खड्डे न भरल्यास रास्ता रोको आंदोलन ः प्रद्युम्न माने

sakal_logo
By

rat25p34.jpg
58671
साडवली ः बांधकाम विभागाला निवेदन देताना ग्रामस्थ.

साडवली रस्त्यावरील खड्डे
न भरल्यास रास्ता रोको
साडवली, ता. २५ः देवरूख-संगमेश्वर राज्य महामार्गावर साडवली कासारवाडी येथील नवीन झालेल्या रस्त्याची चाळण झाली आहे. दरवर्षी या परिसरात पावसाचे पाणी साठत असते म्हणून भराव टाकून उंची वाढवून हा रस्ता तयार केलेला आहे. याच ठिकाणी अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. चार दिवसात याबाबत कार्यवाही न झाल्यास रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बांधकाम विभागाला याबाबत अनेक निवेदने देऊनही कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. हे खड्डे लवकरच भरण्यात यावेत यासाठी महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन तालुका संगमेश्वर तसेच वाघजाई क्रीडा मंडळ साडवली व साडवली ग्रामस्थ यांच्यावतीने बांधकामविभागाला निवेदन देण्यात आले आहे. येत्या चार दिवसात याबाबत कार्यवाही न झाल्यास रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा कार्याध्यक्ष प्रद्युम्न माने व साडवली सरपंच राजेश जाधव यांनी दिला आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालक व पादचारी त्रस्त झालेले आहेत. तरी बांधकाम विभागाने वेळीच रस्त्याची डागडुजी करावी यासाठी अभियंता विवेक देसाई यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, राजू वणकुंद्रे व साडवली ग्रामस्थ उपस्थित होते. लवकरात लवकर या रस्त्याकडे आम्ही लक्ष घालू, अशी ग्वाही या वेळी देसाई यांनी दिली.