दाभोळ ः झाडावर आदळून आग लागल्याने कार भस्मसात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ ः झाडावर आदळून आग लागल्याने कार भस्मसात
दाभोळ ः झाडावर आदळून आग लागल्याने कार भस्मसात

दाभोळ ः झाडावर आदळून आग लागल्याने कार भस्मसात

sakal_logo
By

rat२५p३६.jpg ः
५८६७३
दापोली - येथे अपघातग्रस्त मोटारीली लागलेली आग.

झाडावर आदळून आग लागल्याने मोटार भस्मसात
दाभोळ, ता. २५ः दिवाळीसाठी पुणे येथून जालगाव येथील आपल्या घरी येताना मंडणगड-दापोली मार्गावरील मौजे दापोली येथे काल ( ता. २४) मध्यरात्री एक मोटार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आपटून या मोटारीला आग लागली. या आगीत मोटार भस्मसात झाली. सुदैवाने मोटारीतून प्रवास करणारे चारजण बचावले आहेत.
याबाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील प्रसाद जोशी हे त्यांची कार (क्र. एमएच.०४.जि. झेड. ९३४२) आपल्या कुटुंबासह जालगाव येथे येत होते. मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास त्यांची गाडी मौजे दापोली येथे आल्यावर ती रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या झाडावर आपटली व तिने पेट घेतला. जोशी व त्यांच्याबरोबर असलेल्यांनी गाडीबाहेर उडी मारून आपला जीव वाचवला; मात्र त्यांचे गाडीत असलेले कपडे, फराळ भस्मसात झाले तर स्टीलच्या डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने वितळून गेले. यात २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची घटना घडल्यावर नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाला पाचारण केल्यावर गाडी पूर्ण जळल्यावर बंब पाऊण तासाने घटनास्थळी दाखल झाला. या प्रकरणाची नोंद दापोली पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास हेडकॉन्स्टेबल नलावडे करत आहेत.