कला उत्सवामध्ये सहभागाचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कला उत्सवामध्ये सहभागाचे आवाहन
कला उत्सवामध्ये सहभागाचे आवाहन

कला उत्सवामध्ये सहभागाचे आवाहन

sakal_logo
By

कला उत्सवामध्ये सहभागाचे आवाहन
सिंधुदुर्ग ः केंद्राच्या कला उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी १० डिसेंबरपर्यंत इच्छुकांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत, असे आवाहन अनुपमा तावशीकर (प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था) यांनी केले आहे. जिल्ह्यातील माध्यमिक व माध्यमिक उच्च स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्यामधील कला गुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत २०१५-१६ पासून कला उत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येतो.
----------------
डीपी बदलल्याने ग्रामस्थांतून समाधान
मालवण ः महावितरणतर्फे श्रावण-गवळीवाडी येथे उघडी असलेली डीपी काढून नव्याने डीपी बसविली आहे. यामुळे ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. उघड्या डीपीमुळे ग्रामस्थ, लहान मुले, पाळीव जनावरांना धोका संभवत असल्याबाबत महावितरणचे लक्ष वेधले होते. नजीकच शाळा व हनुमान मंदिरही आहे. ही विद्युत वाहिनी डीपी जीर्ण होऊन उघडी पडली होती. यासाठी ही डीपी बदलावी, अशी मागणी होती. याची दखल घेऊन रामगड विद्युत विभागाने ही विद्युत डीपी बदलली.
----------------
विद्यार्थ्यांना बँकिंगचे धडे
मालवण ः महात्मा गांधी विद्यालय श्रावण क्रमांक एकच्या सातवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षिका साक्षी कुबल यांनी बँकिंग व्यवहार कसे करावे, याचे प्रात्यक्षिकांसह बँकिंग शिक्षण दिले. बँकेत पैसे भरणे, काढणे, खाते उघडणे आदी व्यवहार कसे करायचे, याबाबतची माहिती दिली. सातवीचे विद्यार्थी अथर्व गवळी, निमिषा परब, रेवती लाड, कुणाल परब नीरजा परब, वेदांत परब, राजाराम परब व संजीवनी बाईत आदी विद्यार्थ्यांनी बँकिंग व्यवहाराचे प्रशिक्षण घेतले. या उपक्रमाबद्दल परिसरातून शाळेसह शिक्षकांचे कौतुक होत आहे.
---------------
आसोली परिसरात बिबट्याची दहशत
आरवली ः आसोली-घाडीवाडी भागात सध्या बिबट्याचा वावर सुरू आहे. या वाडीमध्ये आतापर्यंत एकूण पाच कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. सध्या भातकापणीची कामे सुरू असून शेतकरी वर्गाचा शेतात वावर आहे. बिबट्याच्या वावराने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनखात्याने यावर वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांची आहे.