जिल्ह्यात ९,१६७ शेतकऱ्यांना ‘प्रोत्साहन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात ९,१६७ शेतकऱ्यांना ‘प्रोत्साहन’
जिल्ह्यात ९,१६७ शेतकऱ्यांना ‘प्रोत्साहन’

जिल्ह्यात ९,१६७ शेतकऱ्यांना ‘प्रोत्साहन’

sakal_logo
By

जिल्ह्यात ९,१६७ शेतकऱ्यांना ‘प्रोत्साहन’

पहिला टप्पा ः २८.२९ कोटीचे वाटप; उर्वरित अनुदानाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २५ ः राज्याने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २३ हजार ५९० लाभार्थींची पहिल्या टप्प्यात यादी जाहीर केली; मात्र आतापर्यंत फक्त ९ हजार १६७ शेतकऱ्यांना २८ कोटी २९ लाख रुपये प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित अनुदान वितरित कधी होणार, याबाबत प्रतीक्षा कायम आहे.
राज्याने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोसाहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला आणि २१ ऑक्टोबरपासून याचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २७ हजार शेतकऱ्यांपैकी पहिल्या टप्प्यात २३ हजार ५९० शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान लाभ देण्यासाठी यादी निश्चित करण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत ९ हजार १६७ शेतकऱ्यांना २८ कोटी २९ लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले असून येत्या दोन दिवसांत एकूण १२,८४२ जणांचे अनुदान वितरित होणार आहे. तसेच १२,१५६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे. अजूनही ६८६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेनंतर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजना लागू करावी, या मागणीवर राज्याने घेतलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील २७ हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजनेचा लाभ देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय शासनाने घेतला; परंतु पहिल्या टप्प्यातील २३,५९० लाभार्थी वगळता अजूनही ३,४१० लाभार्थी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्याच्या या प्रोत्साहन योजनेअंतर्गत २१ ला राज्यात जिल्हा निहाय शेतकऱ्यांचा मेळावा बैठक घेऊन या प्रोत्साहन योजनेबाबत जनजागृती करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत जिल्हा बँक, बँक ऑफ इंडिया, राष्ट्रीयकृत व ग्रामीण व्यापारी बँकांमधून ९ हजार १६७ शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात आले आहे. प्राप्त यादीपैकी अजूनही सुमारे १५ हजार शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. त्यात १२,१५६ जणांची आधार लिंक झाली असून १२,८४२ जणांची यादी बँकेमार्फत शासनाकडे निश्चित झाली आहे.