वृद्ध कलाकारांच्या खात्यात सप्टेंबरचे मानधन जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृद्ध कलाकारांच्या खात्यात
सप्टेंबरचे मानधन जमा
वृद्ध कलाकारांच्या खात्यात सप्टेंबरचे मानधन जमा

वृद्ध कलाकारांच्या खात्यात सप्टेंबरचे मानधन जमा

sakal_logo
By

वृद्ध कलाकारांच्या खात्यात
सप्टेंबरचे मानधन जमा
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २५ ः वृद्ध कलाकार मानधन योजनेचे लाभार्थी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०४६ वृद्ध कलाकारांच्या बँक खात्यात सप्टेंबरचे मानधन जमा करून शासनाने त्यांची दिवाळी गोड केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाच्या वृद्ध कलाकार मानधन योजनेचे १ हजार ४६ लाभार्थी आहेत. या वृद्ध कलाकारांना सप्टेंबर २०२२ पर्यंत प्रतिमहा २ हजार २५० रुपयेप्रमाणे एप्रिलपासून गेल्या सहा महिन्यांत त्यांच्या बॅंक खात्यात प्रत्येकी १३ हजार ५०० रुपये मानधन जमा करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्याचे २३ लाख ५३ हजार ५०० रुपये एवढे मानधन वितरीत करण्यात आले असून एप्रिलपासून सप्टेंबरपर्यंत गेल्या सहा महिन्यात एकूण १ कोटी ४१ लाख २१ हजार रुपये एवढ्या मानधनाचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून देण्यात आली.
जिल्ह्यात वृध्द कलाकारांची संख्या मोठी आहे. यामध्ये भजन, कीर्तन, दशावतार यासारख्या विविध कलाक्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या वृद्ध कलाकारांचा समावेश आहे. वृद्ध कलाकारांना मानधन देण्याची योजना शासनाकडून राबवली जात असून या योजनेंतर्गत जिल्ह्यातील १०४६ वृद्ध कलाकारांना लाभ मिळत आहे. शासनाकडून वृद्ध कलाकारांच्या बँक खात्यावर दरमहा २ हजार २५० रुपये एवढे मानधन जमा केले जाते. त्यानुसार सप्टेंबरपर्यंतचे मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.