‘छोटा सायन’मध्ये लवकरच ‘वेलनेस’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘छोटा सायन’मध्ये लवकरच ‘वेलनेस’
‘छोटा सायन’मध्ये लवकरच ‘वेलनेस’

‘छोटा सायन’मध्ये लवकरच ‘वेलनेस’

sakal_logo
By

‘छोटा सायन’मध्ये लवकरच ‘वेलनेस’
मुंबई, ता. २३ : पालिकेच्या धारावी परिसरातील छोटा सायन रुग्णालयात लवकरच वेलनेस क्लिनिक सुरू केले जाणार आहे. असंसर्गजन्य रोग (एनसीडी) कॉर्नरमधून आढळणाऱ्या मधुमेह आणि उच्चरक्तदाबाच्या रुग्णांवर या वेलनेस क्लिनिकमध्ये उपचार केले जाणार आहेत. हा प्रकल्प महिन्याभरात सुरू केला जाणार आहे.
ऑगस्टमध्ये सुरू केलेल्या असंसर्गजन्य रोग (एनसीडी) कॉर्नरवरील अनुभवाच्या आधारावर सायन रुग्णालयाने धारावीत हेल्थ आणि वेलनेस केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्राद्वारे स्थानिकांना अंमली पदार्थांचे सेवन, जीवनशैलीत बदल आणि इतर गोष्टींसह तणाव व्यवस्थापन यावर समुपदेशन दिले जाईल. असंसर्गजन्य रोगांची तपासणी सुरू करणारे हे पालिकेचे पहिले रुग्णालय आहे. डॉक्टरांच्या निरीक्षणानुसार, तपासल्या जाणाऱ्यांपैकी २० टक्‍के लोकांना एक किंवा दोन्ही स्थिती आढळून आल्या. त्यामुळेच त्यांना प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी काम करणाऱ्या सर्वांगीण केंद्राची कल्पना सुचली आहे. समुपदेशनाव्यतिरिक्त, केंद्रामध्ये निदान सुविधा देखील असेल ज्यातून १५० प्रकारच्या तपासण्या केल्‍या जातील. यासह केंद्रात आवश्यक असणाऱ्या सीटी स्कॅन आणि एमआरआय मशिनसाठीचा प्रस्ताव यापूर्वीच दिला गेला आहे.
--
कोट
आमच्याकडे समुपदेशक, फिजिओथेरपिस्ट, आहारतज्‍ज्ञ आणि इतर तज्‍ज्ञांची टीम असेल. स्थानिकांना समुपदेशनाद्वारे अंमली पदार्थ आणि मादक पदार्थांचे सेवन कशाप्रकारे टाळायचे याविषयी माहिती देतील. यासह जीवनशैली सुधारण्याचा सल्ला देखील देऊ. ज्यामुळे लोकांना मधुमेह आणि उच्चरक्तदाब यांसारखे आजार टाळण्यास मदत होईल.
– डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता, सायन रुग्णालय