लांजा-रिंगणेत मोबाईल टॉवरच्या कामाचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा-रिंगणेत मोबाईल टॉवरच्या कामाचे भूमिपूजन
लांजा-रिंगणेत मोबाईल टॉवरच्या कामाचे भूमिपूजन

लांजा-रिंगणेत मोबाईल टॉवरच्या कामाचे भूमिपूजन

sakal_logo
By

rat28p3.jpg
L58853
लांजाः रिंगणे गावातील टॉवरच्या कामाचे भूमिपूजन करताना रिंगणे गावचे नवनिर्वाचित सरपंच संजय आयरे.
---------
रिंगणेत मोबाईल टॉवरच्या कामाचे भूमिपूजन
लांजा, ता. २८ ः निवडणुकीपूर्वी गावात मोबाईल टॉवर उभारणार हे दिलेले आश्वासन विजयाचा गुलाल उतरण्यापूर्वी या टॉवरच्या कामाचे भूमिपूजन करून रिंगणे गावचे नवनिर्वाचित सरपंच संजय आयरे यांनी वचनपूर्ती केली आहे. पुढील तीन महिन्यात टॉवर उभारणीचे काम पूर्ण करून तो कार्यान्वित केला जाणार आहे.
रिंगणे गावात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने गावात एखादा टॉवर उभारून नेटवर्क उपलब्ध करण्याची मागणी गेली कित्येक वर्ष केली जात होती. माजी सरपंच सुलभा आयरे यांच्या कार्यकाळात टॉवरच्या मागणीने जोर धरला होता. तेव्हापासून नवनिर्वाचित सरपंच संजय आयरे हे गावात टॉवर उभारणीसाठी प्रयत्नशील होते व सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या पाठपुराव्याला बीएसएनएल कंपनीने प्रतिसाद दिला व गावात टॉवर उभारणीसाठी तयारी दर्शवली सुधाकर आयरे यांची हांदेवाडी (भालेकरांच्या घराजवळ) असलेली जागा टॉवरसाठी योग्य असल्याची निश्चित करण्यात आली. ही जागा भाडेतत्त्वावर कंपनीला देण्यासाठी संजय आयरे यांनी सुधाकर आयरेंची मनधरणी केली. सुधाकर आयरेंनीही कोणतीही हरकत न घेता आपली जागा भाडेतत्त्वावर देण्यास लगेचच तयारी दर्शवली. या कामाचे भूमिपूजन नवनिर्वाचित सरपंच संजय आयरे यांनी केले. या वेळी आर्या आयरे, शरद आयरे, नागेश पाथरवड, सुभाष आयरे, सुरेश आयरे, प्रकाश हांदे, संजय हांदे, सुनील हांदे, सुहासिनी शिंदे, तानाजी आयरे, चंद्रकांत आयरे आदी उपस्थित होते.