वासुदेव वाघे यांना आर्ट बिटस् महाराष्ट्र कला सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वासुदेव वाघे यांना आर्ट बिटस् महाराष्ट्र कला सन्मान
वासुदेव वाघे यांना आर्ट बिटस् महाराष्ट्र कला सन्मान

वासुदेव वाघे यांना आर्ट बिटस् महाराष्ट्र कला सन्मान

sakal_logo
By

rat28p8.jpg-
58860
वासुदेव वाघे
----------
आर्ट बिटस् महाराष्ट्र कला
सन्मान वासुदेव वाघेना
रत्नागिरी, ता. २८ः विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि आरोग्यक्षेत्रात कार्यरत प्रसिद्ध भजनी बुवा वासुदेव भिकाजी वाघे यांना पुण्याच्या आर्ट बिटस् फाउंडेशनचा राज्यस्तरीय लोककला सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि आरोग्य क्षेत्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील अग्रेसर आभार सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळाचे सचिव, आभार संस्था संचलित रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळाचे सचिवपद ते भूषवत आहेत तसेच जिल्हा रुग्णालय कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष, जीवनधारा शासकिय रुग्णालय कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष, खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक, खारवी समाज विकास समितीचे सदस्य, पूर्णगड खारवी समाज परिवर्तन मंचाचे उपाध्यक्ष आहेत. राज्यस्तरीय पुरस्काराच्या लोककला विभागातील कला सन्मान पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे. आर्ट बिटस् फाउंडेशनकडून प्रौढ कलाकारांना सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार ऑनलाइन पद्धतीने प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे लोककलावंत वासुदेव वाघे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यापूर्वीही त्यांना विविध प्रकारचे २२ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
या पुरस्काराची माहिती देताना आर्ट बिटस् संस्थेचे संस्थापक, संचालक संतोष पांचाळ म्हणाले की, सहा कला विभागात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. वासुदेव वाघे यांचे सर्व क्षेत्रातील असलेले गुणात्मक काम त्यामुळे या विशेष कामाची दखल घेऊन ही निवड केली आहे. आर्ट बिटस् ही संस्था गेली २१ वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला अशा सर्वच विभागातील कला क्षेत्रातील कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहे.