वहाळमध्ये रंगणार चतुरंगची दिवाळी पहाट मैफल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वहाळमध्ये रंगणार चतुरंगची दिवाळी पहाट मैफल
वहाळमध्ये रंगणार चतुरंगची दिवाळी पहाट मैफल

वहाळमध्ये रंगणार चतुरंगची दिवाळी पहाट मैफल

sakal_logo
By

rat२८p११.jpg-
५८८६५
अजिंक्य पोंक्षे, श्वेता जोगळेकर
--------------
वहाळमध्ये रंगणार चतुरंगची दिवाळी मैफल
रत्नागिरी, ता. २८ ः चतुरंग प्रतिष्ठानची दिवाळी मैफल चिपळूणजवळच्या वहाळ या निसर्गरम्य कोकण खेड्यात रंगणार आहे. चतुरंगच्या ''निवासी अभ्यासवर्ग'' या पालक, विद्यार्थीप्रिय अशा शैक्षणिक उपक्रमात यंदा एक विशेष भाग म्हणून रंगणारी ही जुगलबंदी मैफल रविवारी (ता. ३०) सकाळी ७.१५ वा. न्यू स्कूल वहाळ शाळेतील सभागृहात होणार आहे. विनामूल्य प्रवेश असलेल्या या मैफलीचा लाभ रसिकश्रोत्यांनी घ्यावा, असे आवाहन चतुरंगने केले आहे.
या वर्षी चतुरंगने जाणीवपूर्वक कोकणातील लोकप्रिय कलाकारांना प्राधान्य दिले असून वहाळमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या सूर प्रभाती, रंगती या मैफलीत गायक अजिंक्य पोंक्षे आणि श्वेता तांबे-जोगळेकर यांच्या नाट्यगीत, भावगीत, भक्तीगीत, अभंग अशा संमिश्र सुश्राव्य जोडगायनाची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. या मैफलीला तबलासाथ हेरंब जोगळेकर आणि हार्मोनियमसाथ चैतन्य पटवर्धन संगीतसाथ करणार असून निवेदन निबंध कानिटकर करणार आहेत. कोरोनाचा अंधार ओसरल्यावर यावर्षीची दिवाळी पहाट मैफल चिपळूणजवळच्या वहाळ या निसर्गरम्य कोकणखेड्यात होत आहे.
----------------
चौकट १
१९८६ पासून दिवाळी मैफल
दिवाळी पहाट या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाची मूळ संकल्पना चतुरंग प्रतिष्ठानची आहे. चतुरंगनेच ती १९८६ ला मुंबईत सर्वप्रथम अंमलात आणली. विशेष म्हणजे गेल्या ३६ वर्षांत मुंबई, ठाणे, पुणे, चिपळूण, वहाळ, गुणदे, रत्नागिरी, गोवा असा प्रवास करत करत गतवर्षी सुवर्णमहोत्सवी दिवाळी पहाट साकारली. आकाशकंदील, रांगोळ्या, पणत्या, सुगंधी स्वागत, एखाद्या संस्थेला भाऊबीजभेट, सर्व रसिकांना फराळ आणि संगीत मैफल, या आपल्या सात वैशिष्ट्यांनिशी ५० दिवाळी पहाट साकार करून सर्वदूर महाराष्ट्राला सांगितीक मेजवानी दिली आहे.