प्रेरणादायी व्यक्तिमत्व डॉ. चंद्रकांत सावंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेरणादायी व्यक्तिमत्व डॉ. चंद्रकांत सावंत
प्रेरणादायी व्यक्तिमत्व डॉ. चंद्रकांत सावंत

प्रेरणादायी व्यक्तिमत्व डॉ. चंद्रकांत सावंत

sakal_logo
By

टीप ः सोबतचा लेख हा 16 बाय 25 आकारात गुरुवंदना आयडॉल संदर्भातील आहे. तीन फोटो व लेख तयार करून पाहण्यास पाठवावा.
- हेमंत खानोलकर
..................

58877
डॉ. चंद्रकांत सावंत
58879
पुरस्कारासह डॉ. चंद्रकांत सावंत
58880
फणसवडे ः येथील श्री देव मल्नाथ महिला बचतगट सदस्यांकडून सन्मान स्वीकारताना डॉ. चंद्रकांत सावंत.


प्रेरणादायी व्यक्तिमत्व डॉ. चंद्रकांत सावंत

लीड
समाजात अशा काही व्यक्ती असतात, ज्या प्रबोधनासोबत सामाजिक कार्यात आपले वेगळे स्थान निर्माण करतात. विद्यार्थ्यांना घडवण्याबरोबरच शैक्षणिक, सामाजिक कार्याद्वारे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ देऊन शैक्षणिक, सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देतात. आंबोली-गावठणवाडी येथील रहिवासी तथा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, मठ नं. २ (ता. वेंगुर्ले) येथील पदवीधर शिक्षक डॉ. चंद्रकांत तुकाराम सावंत यापैकीच एक. त्यांच्या कार्याविषयी...
...............
डॉ. चंद्रकांत सावंत यांनी आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक, उच्च प्राथमिक ७० शाळांमधील ९४ विद्यार्थिनी व माध्यमिक पाच हायस्कूलमधील २५ विद्यार्थिनी मिळून एकत्रित ७५ शाळांमधील ११९ विद्यार्थिनी कायमस्वरुपी दत्तक घेत आतापर्यंत ३ लाख ७४ हजार रुपये एवढी रक्कम कायमस्वरुपी देणगी देऊन शैक्षणिक सामाजिक कार्यात कौतुकास्पद काम केले आहे. सावंतवाडी तालुक्यातील फणसवडेतील महिला बचतगटांचे मार्गदर्शक व्यवस्थापक म्हणून काम करत असताना त्यांनी महिला सदस्यांची कर्ज रक्कम सुमारे ५ लाख ३५ हजार रुपये एवढी स्वतःच्या खिशातून देत या महिलांना कर्जमुक्त करण्याचे अतिशय मोलाचे कार्य केले आहे. आपल्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची सुरुवात दुर्गम भागात करत त्यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.
त्यांनी मठ, आंबोली येथे स्मार्ट डिजिटल शाळेसाठी कायम ठेव योजनेसाठी सहकार्य केले आहे. ठिकठिकाणी प्राथमिक शाळेत मुलांना शुद्ध पेयजल, हॅन्डवॉश स्टेशनसाठी सहकार्य, खेळाडू विद्यार्थ्यांसाठी सहकार्य, शालेय खोल्यांतील लाईटसाठी सहकार्य, आईवडिलांचे आकस्मिक निधन झालेल्या मुलांना आर्थिक सहकार्य तसेच माणुसकीचा आधार देण्याचे कामही केले आहे. नाट्यमंडळ, कलाकारांना सहकार्य, बालिका सन्मान, कायमस्वरुपी वाढदिवस भेट, कला-क्रीडा मंडळांस कायमस्वरुपी देणगी अशी अनेक सामाजिक कामे ते आजपर्यंत करत आहेत.
या त्यांच्या विविध सामाजिक कार्याची दखल विविध संस्थांनी घेत त्यांना विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, शिक्षकरत्न, समाजरत्न, जीवनगौरव, भारतभूषण, राष्ट्रीयरत्न, कोकणरत्न असे विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. डॉ. सावंत हे डॉक्टर ऑफ एज्युकेशन, डॉक्टर ऑफ फिलोसॉफी व डॉक्टर ऑफ लिटरेचरसह तीन आंतरराष्ट्रीय मानांकित मानद डॉक्टरेटचे मानकरी सुद्धा बनलेले आहेत. आपल्या सर्वसामान्य राहणीमानातून आपले असामान्य विचार कार्यरुपी यशस्वी शैक्षणिक, समाजकार्यातून त्यांनी समाजपुढे ठेवत आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या शैक्षणिक, सामाजिक कार्याची नोंद OMG BOOK OF NATIONAL RECORDS २०२२, GENIUS BOOK OF WORLD RECORDS २०२२, FOREVER STAR BOOK OF WORLD RECORDS २०२२, VICTORIOUS INTERNATIONAL BOOK OF RECORDS २०२२ मध्ये करण्यात आली आहे.