सावंतवाडीतील हायमास्ट सुरू करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीतील हायमास्ट सुरू करा
सावंतवाडीतील हायमास्ट सुरू करा

सावंतवाडीतील हायमास्ट सुरू करा

sakal_logo
By

58883
सावंतवाडी ः पालिकेने उभारलेले तसेच उद्‍घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले हायमास्ट.


सावंतवाडीतील हायमास्ट सुरू करा

मनसेची मागणी; पक्षातर्फे उद्‍घाटनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ : येथील पालिकेच्या माध्यमातून सहा ठिकाणी नव्याने उभारण्यात आलेले हायमास्ट पथदीप उद्‍घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. वारंवार मागणी करूनही ते सुरू न केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. हे हायमास्ट पालिका प्रशासनाने तत्काळ सुरू करावेत, अन्यथा मनसेच्या माध्यमातून त्यांचे उद्‍घाटन करू, असा इशारा शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिला.
शहरात पालिकेच्या माध्यमातून मोक्याच्या आणि वर्दळ असलेल्या ठिकाणी हे हायमास्ट उभारण्यात आले आहेत. यात उपरलकर देवस्थान, पंचायत समिती कॉर्नर, खासकीलवाडा, पाटणकर घर, शासकीय विश्रामगृहाजवळ, मिलाग्रीस हायस्कूलच्या मागे, अभिषेक टॉवर समोर हायमास्ट उभारले आहेत. त्या ठिकाणी जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना रात्रीच्यावेळी फायदा व्हावा, हा या मागचा उद्देश आहे; परंतु हायमास्ट उभारून महिना ते दीड महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप ते सुरू करण्यात आले नाहीत. याबाबत मनसेने पालिकेकडे विचारणा केली असता काम पूर्ण झाले आहे; परंतु उद्‍घाटन न झाल्यामुळे हायमास्ट सुरू केले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तत्काळ हायमास्ट सुरू करण्याबाबत योग्य कार्यवाही करावी; अन्यथा उद्‍घाटनाचाच विषय असेल तरी मनसेचे पदाधिकारी हायमास्टचे उद्‍घाटन करतील, असा इशारा सुभेदार यांनी दिला.