रक्तदानातून सामाजिक ऐक्य दृढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रक्तदानातून सामाजिक ऐक्य दृढ
रक्तदानातून सामाजिक ऐक्य दृढ

रक्तदानातून सामाजिक ऐक्य दृढ

sakal_logo
By

58886
सावंतवाडी ः येथे रक्तदान शिबिरप्रसंगी मनसेचे पदाधिकारी, डॉक्टर आदी.

रक्तदानातून सामाजिक ऐक्य दृढ

धीरज परब ः सावंतवाडीत मनसेतर्फे रक्तदान शिबिर

सावंतवाडी, ता. २७ ः रक्तदान शिबिरांच्या आयोजनातून वैश्विक समाजाची संकल्पना दृढ होत आहे. कार्यक्रमाला आलेले सर्व तरुण असून त्यांच्या कार्याचा आदर्श मनसेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी घ्यावा. रक्तदान शिबिरासारख्या उपक्रमांमुळे सामाजिक ऐक्य दृढ होत आहे. त्यातूनच कार्यकर्त्यांची भावी पिढी घडणार आहे, असे प्रतिपादन मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सावंतवाडी पुरस्कृत व महाराष्ट्र सैनिक जादूगार केतन कुमार सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त येथील उपजिल्हा रुग्णालयात आय़ोजित रक्तदान शिबिराच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी केतन सावंत व सुधीर राऊळ यांच्या उपस्थितीत रुग्णांसह नातेवाईकांना चहा, बिस्कीट व पोहे वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, जिल्हा सचिव बाळा पावसकर, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, परिवहन जिल्हाध्यक्ष ॲड. राजू कासकर, माजी उपजिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, माजी शहराध्यक्ष अभिमन्यू गावडे, कुडाळ प्रभारी तालुकाध्यक्ष सचिन सावंत, मनविसे कॉलेज युनिट अध्यक्ष साहिल तळकटकर, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप सावंत, आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. सागर जाधव, अर्पिता मळेकर, दीपाली राऊळ, अनुष्का मळेकर यांच्या उपस्थितीत झाले. दुसऱ्यासाठी जगणे हेच खरे जगणे, हे या उपक्रमातून केतन सावंत यांनी दाखवून दिले आहे. मनसेचा जिल्हाध्यक्ष म्हणून अशा सामाजिक कार्यक्रमांसाठी सदैव सहकार्य राहील, असे जिल्हाध्यक्ष परब म्हणाले. या शिबिरात जिल्हाध्यक्ष परब, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष राऊळ, माजी शहराध्यक्ष अभिमन्यू गावडे यांनी रक्तदान केले. यावेळी आदित्य राऊळ, शतायू जांभळे, तुकाराम मुळीक, उदय सावंत, आदित्य कोंडविलकर, विशाल दळवी, आकाश मराठे, अनिकेत दळवी आदी उपस्थित होते.