मोती तलाव काठावर दीपोत्सव उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोती तलाव काठावर
दीपोत्सव उत्साहात
मोती तलाव काठावर दीपोत्सव उत्साहात

मोती तलाव काठावर दीपोत्सव उत्साहात

sakal_logo
By

58915

swt2814.jpg मध्ये फोटो आहे.


मोती तलाव काठावर
दीपोत्सव उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. 28 ः शहराला मोती तलाव काठावर सांज पाडवा निमित्ताने विलोभनीय दर्शन दिपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांची प्रचंड गर्दी पहावयास मिळाली.
मोती तलावाच्या काठावर रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आणि इनरव्हील क्लब यांचा संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे दीपोत्सव यंदा देखील मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. माजी नगराध्यक्षा सौ पल्लवी केसरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मोती तलाव काठावर लावलेल्या दिव्यांच्या प्रकशात परिसर प्रकाशमान झाला.‌ हे नयनरम्य दृश्य अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केले. यावेळी फटाक्यांची मनोहारी आतषबाजी देखील करण्यात आली. यावेळी रोटरी अध्यक्षा विनया बाड, इनरव्हील अध्यक्षा दर्शना रासम, रोटरीचे सुहास सतोसकर, अनंत उचगवकर, साईप्रसाद हवालदार, जिगजींनी, इनरव्हीलच्या सुहासिनी तळेगवकर, शीतल केसरकर, देवता हावळ, सोनाली खोर्जुवेकर, रोट्रॅक्टचे मिहीर मठकर, पृथ्वीराज चव्हाण, अराबेकर आदी रोटरी, इनरव्हील्सचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.