सावंतवाडीत ‘सांज पाडवा’ने चैतन्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत ‘सांज पाडवा’ने चैतन्य
सावंतवाडीत ‘सांज पाडवा’ने चैतन्य

सावंतवाडीत ‘सांज पाडवा’ने चैतन्य

sakal_logo
By

58917
सावंतवाडी ः येथे कार्यक्रमाचे उद्‍घाटन करताना माजी नगराध्यक्ष पल्लवी केसरकर.


सावंतवाडीत ‘सांज पाडवा’ने चैतन्य

उत्स्फूर्त दाद; केशवसूत कट्ट्यावर रंगली मैफल

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः गायनाच्या सुरेल मैफलीने ‘पाडवा पहाट’ संगीतमय झाल्यानंतर सायंकाळी पार पडलेल्या ‘सांज पाडवा’ने शहरात चैतन्य निर्माण केले. मोती तलावाच्या सानिध्यात येथील केशवसुत कट्टा येथे माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर यांच्या उपस्थितीत ‘सांज पाडवा’ साजरा करण्यात आला.
पाडवा व भाऊबीजेच औचित्य साधून शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर मित्रमंडळातर्फे बुधवारी सायंकाळी केशवसुत कट्टा येथे ‘सांज पाडवा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोती तलावाच्या मध्यभागी होणारा ‘स्वरांजली ग्रुप जयसिंगपूर’चा हा कार्यक्रम सावंतवाडीकरांसाठी विशेष पर्वणी ठरला. माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर यांच्या हस्ते याचा प्रारंभ करण्यात आला. हिंदी-मराठी गाण्यांचा सदाबहार नजराणा प्रसाद होशिष्टे, विनोद सावंत, अविनाश इनामदार, मिलिंद बनसोडे, संदीप वाडेकर, कातिका कांबळे आदी कलाकारांनी गीत गायन आणि वाद्यांच्या माध्यमातून सादर केला. ध्वनी संयोजन अकबर इनामदार, परेश मुद्राळे यांनी केले, तर सूत्रसंचालन कपिल कांबळी यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने सावंतवाडीकर केशवसुत कट्टयासह तलावाकाठी उपस्थित होते. सदाबहार गीतांच्या सादरीकरणाने केशवसुत कट्ट्यासह मोती तलाव काठ चैतन्याने फुलला होता. यावेळी मित्रमंडळाचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, आबा केसरकर, सुजित कोरगावकर, अनारोजीन लोबो, शुभांगी सुकी, भारती मोरे, नीता कविटकर, दीपाली सावंत, सुरेंद्र बांदेकर, प्रदीप ढोरे, मुकुंद वझे, दत्तप्रसाद गोठोस्कर आदींसह शेकडो संगीतप्रेमी उपस्थित होते. दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर मोती तलाव काठ फुलून गेला होता. शहरातील नागरिकांना आनंदाची मैफिल मिळावी, यासाठी केशवसुत कट्ट्यावर विविध उपक्रम आयोजित करण्यात येतात.