बदली पात्र शिक्षकांसाठी अवघड क्षेत्रातील 686 शाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बदली पात्र शिक्षकांसाठी अवघड क्षेत्रातील 686 शाळा
बदली पात्र शिक्षकांसाठी अवघड क्षेत्रातील 686 शाळा

बदली पात्र शिक्षकांसाठी अवघड क्षेत्रातील 686 शाळा

sakal_logo
By

बदली पात्र शिक्षकांसाठी अवघड क्षेत्रातील ६८६ शाळा
जिल्हा परिषद ; जुन्या यादीनुसार कार्यकालाचा विचार होणार
रत्नागिरी, ता. २८ ः जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी अवघड क्षेत्रातील शाळा निश्‍चित केल्या आहेत. ज्या शिक्षकांनी गेली अनेक वर्षे सुगम क्षेत्रात काम केले आहे त्यांना अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये नियुक्ती दिली जाणार आहे. त्यासाठी यंदा नव्याने निश्‍चित केलेल्या ६८६ अवघड क्षेत्रातील शाळांची यादी निश्‍चित केली आहे. ती ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केली गेली आहे.
गेले काही महिने रखडलेली बदली प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश नुकतेच ग्रामविकास विभागाकडून प्राप्त झाले आहेत. ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी आवश्यक माहिती भरण्याचे वेळापत्रक निश्‍चित केले आहे. पहिल्या टप्प्यात अवघड क्षेत्रातील शाळांची यादी निश्‍चित करून ती सरल पोर्टलवर भरण्यात आली आहे. बदली प्रक्रियेमध्ये अवघड क्षेत्रात काम केलेल्यांचा कार्यकाळ जुन्या यादीप्रमाणे ठरवण्यात येणार आहे. दोन वर्षांपूर्वी अवघड क्षेत्रात ८४६ शाळा होत्या. त्या शाळांमध्ये काम केल्याची वर्षे बदलीतील निकषांमध्ये विचारात घेतली जातील. बदलीच्या ठिकाणी नियुक्ती देताना नवीन निकषाप्रमाणे यंदा ज्या शाळा अवघड क्षेत्रात निश्‍चित केल्या आहेत त्यामध्येच बदली केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. नवीन निकषांमध्ये ६८६ शाळा अवघड क्षेत्रात आहेत. जुन्या यादीतील १६० शाळा कमी झाल्या आहेत. अवघड क्षेत्रातील शाळांची यादी निश्‍चित झाल्यामुळे बदलीसाठी त्यांचाच विचार केला जाणार आहे.
--------------
चौकट
असा असेल कार्यक्रम

बदलीपात्र शिक्षकांच्या जाहीर यादीवरील आक्षेप ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत शिक्षणाधिकार्‍यांकडे करता येतील. २ ते ५ दरम्यान शिक्षणाधिकार्‍यांकडे सुनावणी होईल. ६ ते ७ नोव्हेंबरपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपील व सुनावणी. ११ ला संवर्ग १ व २ च्या याद्या जाहीर केल्या जातील. १२ ला रिक्त जागांची यादी जाहीर होईल. १३ व १५ या काळात शिक्षकांना संवर्ग १ साठी प्राधान्यक्रम भरता येणार येईल. १६ व १८ नोव्हेंबरला विशेष संवर्ग १ साठी बदली प्रक्रिया होईल. १९ ला रिक्त जागांची यादी प्रकाशित केली जाईल. ११ व १३ डिसेंबरदरम्यान विस्थापित शिक्षकांसाठी पर्याय भरता येतील. १४ ते १६ दरम्यान विस्थापित शिक्षकांसाठी बदली प्रक्रिया. १७ ला रिक्त पदांची यादी जाहीर होईल. १८ ला १० वर्षे सुगम क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध होईल. १९ ते २१ दरम्यान अवघड क्षेत्रात रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी राउंड होईल. २५ डिसेंबरला बदली आदेश प्रकाशित होणार आहेत.
---
चौकट
तालुका अवघड क्षेत्रातील शाळा
* दापोली ६६
* मंडणगड ५२
* खेड १८९
* गुहागर ३७
* चिपळूण १२१
* संगमेश्‍वर ९९
* रत्नागिरी १
* लांजा ३३
* राजापूर ८८