अवधूत बाम यांची तीनपासून अभंगवाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवधूत बाम यांची तीनपासून अभंगवाणी
अवधूत बाम यांची तीनपासून अभंगवाणी

अवधूत बाम यांची तीनपासून अभंगवाणी

sakal_logo
By

rat28p30..jpg
58903
डॉ. श्रीधर पवार
-----------
श्रीधर पवार यांना
काव्य पुरस्कार
चिपळूण ः सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग यांच्यावतीने दिला जाणारा उत्तम पवार स्मृतीप्रित्यर्थ ''उत्तम-सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्य पुरस्कार'' चिपळूण तालुक्याचे सुपुत्र असणाऱ्या डॉ. श्रीधर पवार यांना त्यांच्या ''अर्धे आकाश माथ्यावर'' या काव्यसंग्रहासाठी जाहीर झाला आहे. तसेच आ सो तथा आबा शेवरे स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा ''आ बा शेवरे जीवनगौरव पुरस्कार'' ज्येष्ठ लेखिका व आंबेडकरी विचारवंत उर्मिलाताई पवार यांना जाहीर करण्यात आला असून, हा पुरस्कार वितरण समारंभ शनिवारी (ता. २९) मुंबईत दादर येथे पार पडणार आहे. पुरस्कार वितरणाला ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर, आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे, साहित्यिक मोतीराम कटारे, डॉ. महेश केळुसकर, डॉ. शामल गरुड, डॉ. सोमनाथ कदम हे उपस्थित राहणार आहेत. डॉ. श्रीधर पवार हे चिपळूण तालुक्यातील मांडकी गावचे सुपुत्र आहेत. लहानपणापासूनच मुंबईत वास्तव्याला आहेत. मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय पदवी संपादन केल्यानंतर मुंबईत त्यांनी वैद्यकीय सेवा बजावली आहे. नुकतेच ते शासकीय वैद्यकीय सेवेतून सेवानिवृत्तही झाले आहेत; मात्र आपल्या वैद्यकीय पेशासोबतच साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात आपला वावर त्यांनी सक्रिय ठेवला.
-----------
जुन्या स्वेटरने द्या
माणुसकीची उब
रत्नागिरी ः थंडी सुरू झाल्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने एक संकल्पना पुढे आणली आहे. यानुसार त्यांनी जनतेला आवाहन केले आहे. जनतेने आपला जुना स्वेटर टाकून देऊ नका तर आपले जुने स्वेटर स्वच्छ धुवून आपल्या दुचाकी, मोटारच्या डिक्कीत ठेवा. ऑफिस, कॉलेज किंवा बाहेर जाताना अशी चिमुकले रस्त्यावर कुडकुडताना दिसले तर त्यांना हे स्वेटर देऊन आपल्या वाट्याची माणुसकीची ऊब द्या. आपल्याला वेळ नसेल तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव अ‍ॅड. बंटी वणजू आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. साईजित शिवलकर, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष पप्पू तोडणकर यांच्याशी संपर्क साधावा.
-----------
rat28p26.jpg
58899
अवधूत बाम
-----
अवधूत बाम यांची
तीनपासून अभंगवाणी
रत्नागिरीः आकाशवाणीचे मान्यताप्राप्त संगीतकार अवधूत बाम यांनी संगीतबद्ध केलेल्या अभंगवणीचा नजराणा ३ नोव्हेंबरपासून कलावैभव यू ट्यूब चॅनलवर रसिकांना ऐकायला मिळणार आहे. अभंगरचना विविध रांगांमध्ये गुंफत सुमधूर चालीत त्या बांधणं ही अवधूत बाम यांची खासियत सावळे सुंदर रूप मनोहर या विठ्ठल गीतांच्या अभंगवणीतून पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. कलावैभव संस्थेतर्फे कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने ही सुरेल भेट विठ्ठल भक्तांसाठी सादर होणार आहे. गायक प्रसाद शेवडे, मुग्धा भट-सामंत आणि स्वप्नील गोरे यांच्या सुमधूर स्वरात आहेत. या गीतांना तबलासाथ गिरीधर कुलकर्णी, पखवाजसाथ अभिषेक भालेकर, तालरक्षक हरेश केळकर, ऑर्गनसाथ (कै.) मधुसूदन लेले यांची असून सिंथेसायझरसाथ राजन किल्लेकर यांची आहे. विशेष सहाय्य नितीन वराडकर व प्रसन्न दाते यांचे, संगीत मार्गदर्शन प्रसाद गुळवणी यांचे आहे. संत परंपरेचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने हे सादरीकरण होणार आहे.