‘त्या’ माकडाची अखेर विल्हेवाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘त्या’ माकडाची
अखेर विल्हेवाट
‘त्या’ माकडाची अखेर विल्हेवाट

‘त्या’ माकडाची अखेर विल्हेवाट

sakal_logo
By

‘त्या’ माकडाची
अखेर विल्हेवाट
बांदा ः शेर्ले येथे गौरांग शेर्लेकर यांच्या घराच्या मागील बाजूस मृतावस्थेत आढळलेल्या माकडाची बांदा वनखात्याने पंचनामा करून विल्हेवाट लावली. शेर्लेकर यांच्या घराच्या मागील बाजूस माकड मृत झाल्याचे शेर्लेकर यांना आढळले होते. त्यांनी तात्काळ याची कल्पना सरपंच उदय धुरी यांना दिली. बांदा वनखत्याला माहिती दिल्यानंतर वनपाल अनिल मेस्त्री, वनरक्षक श्री शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत माकडाची विल्हेवाट लावली. यावेळी सरपंच उदय धुरी, गौरांग शेर्लेकर, राजेंद्र शेर्लेकर, विजय तारी, सुबोध गावकर, जना मेस्त्री, अंकुश तारी, प्रशांत धुरी आदी उपस्थित होते.