विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची 29, 30 पडताळणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची 29, 30 पडताळणी
विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची 29, 30 पडताळणी

विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची 29, 30 पडताळणी

sakal_logo
By

विद्युत सहाय्यक कागदपत्रांची
आज, उद्या पडताळणी
रत्नागिरी, ता. २८ ः मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महावितरण कंपनीतील विद्युत सहाय्यक या पदासाठीची सुधारित निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. या संवर्गातील उमेदवारांची तसेच प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी परिमंडलनिहाय २९ व ३० ऑक्टोबर २०२२ ला करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष हजर न राहणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द होणार आहे.
महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी ३ वर्षाच्या निश्चित कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांची निवड करण्यासाठी एप्रिल व जुलै २०१९ मध्ये विद्युत सहाय्यक या पदांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परिमंडलनिहाय यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या परिमंडल कार्यालयांमध्ये २९ व ३० ऑक्टोबर २०२२ ला आपल्या कागदपत्रांची पडताळणी स्वत: उपस्थित राहून करणे अनिवार्य आहे. नव्याने निवड झालेल्या उमेवारांची तसेच प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांची परिमंडलनिहाय यादी महावितरणच्या संकेतस्थळावर (www.mahadiscom.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीकरिता हजर राहणार नाहीत, अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल.