सातार्ड्यात अखेर ‘आनंदाचा शिधा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातार्ड्यात अखेर ‘आनंदाचा शिधा’
सातार्ड्यात अखेर ‘आनंदाचा शिधा’

सातार्ड्यात अखेर ‘आनंदाचा शिधा’

sakal_logo
By

58954
सातार्डा ः येथील रास्त धान्य दुकानारदार यांच्याशी चर्चा करताना शेखर गावकर.


सातार्ड्यात अखेर ‘आनंदाचा शिधा’

शेखर गावकरांच्या पुढाकारानंतर वाटप

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २८ ः सातार्डा येथील रास्त धान्य दुकानात ‘आनंदाचा शिधा’चे वाटप अखेर आॅफलाईन पद्धतीने करण्यात आले. सावंतवाडी तालुका भाजपचे उपाध्यक्ष शेखर गावकर यांनी हा प्रश्न मार्गी लावला.
राज्य शासनाच्या ‘आंनदाचा शिधा’ योजनेअंतर्गत १०० रुपयात ठरलेल्या चार वस्तूंचे सातार्डा येथे वाटप करण्यात येत होते; परंतु, दुकानदाराने ‘आनंदाचा शिधा’ ऑनलाइनच मिळणार असे सांगितल्याने तसेच नेटवर्कचा अडथळा येत असल्याने ग्राहकांना बराच वेळ ताटकळत राहावे लागत होते. ही बाब सावंतवाडी तालुका भाजपचे उपाध्यक्ष शेखर गावकर यांच्या काही ग्राहकांनी निदर्शनास आणल्यावर आज सकाळी गावकर यांनी पत्रकार संजय पिळणकर, आपा परिपत्ये, किरण प्रभू, रमेश पंडित, भाऊ परब, शाम नाईक आदींसह सातार्डा-तरीचावाडा येथील रास्त दराच्या धान्य दुकानावर धडक देऊन सातार्डा, सातोसे, कवठणी येथील शेकडो ग्राहकांसमोर दुकानदार देसाई यांना ऑफलाईन धान्य देण्याची विनंती केली. मात्र, देसाई यांनी आपल्याला तसे वरिष्ठांचे आदेश नसल्याचे सांगितले. यावेळी गावकर यांनी सावंतवाडी तहसीलदारांशी भ्रमणध्वनीवरून येथील परिस्थितीची कल्पना दिली. तहसीलदारांनी नेटवर्क नसल्यास ऑफलाईन धान्य देण्याचे आदेश दुकानदार देसाई यांना दिले. त्यामुळे उपस्थित ग्राहकांनी गावकर यांचे आभार मानले.