कर्करुग्णांसाठी सहा रुग्णालयांत मोफत ओपीडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्करुग्णांसाठी सहा रुग्णालयांत मोफत ओपीडी
कर्करुग्णांसाठी सहा रुग्णालयांत मोफत ओपीडी

कर्करुग्णांसाठी सहा रुग्णालयांत मोफत ओपीडी

sakal_logo
By

कर्करुग्णांसाठी सहा रुग्णालयांत मोफत ओपीडी
जनजागृती अभियान ; तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचाराबाबत मार्गदर्शन
चिपळूण, ता. २८ः कॅन्सरविषयी नागरिकांच्या मनातील भिती दूर करण्यासाठी चिपळूण येथील ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटर आणि रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग जनजागृती अभियान तसेच कर्करोग प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक अवस्थेत निदान होण्यासाठी मोफत तपासणी केली जाणार आहे. यासाठी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल, लांजा, गुहागर, संगमेश्वर, देवरूख, कामथे, दापोली येथील ६ ग्रामीण रुग्णालयांमध्ये मोफत ओपीडी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या गंभीर आजाराचे वेळीच निदान झाल्यास तो बरा देखील होऊ शकतो. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही अनोखी संकल्पना ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरतर्फे राबवली जाणार आहे. कर्करोगाची असलेली भिती दूर करून त्यांना तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचाराबाबत तसेच आजाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. दर सोमवारी सकाळी १० ते २ गुहागर ग्रामीण रुग्णालय येथे, दर मंगळवारी लांजा ग्रामीण रुग्णालय येथे मोफत ओपीडीचा लाभ घेता येईल. दर बुधवारी १० ते २ सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी, दर बुधवारी संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालय येथे सकाळी १० ते २ मोफत ओपीडीचा लाभ घेता येईल. दर गुरुवारी महाड ग्रामीण रुग्णालय येथे सकाळी १० ते २ मोफत ओपीडीचा लाभ घेता येईल. दर शुक्रवारी देवरूख ग्रामीण रुग्णालय येथे सकाळी १० ते २ या वेळेत कर्करुग्णांकरिता मोफत ओपीडी सुरू करण्यात आली आहे. दर शनिवारी दापोली ग्रामीण रुग्णालय येथे सकाळी १० ते २ मोफत ओपीडीचा लाभ घेता येईल. या ओपीडीमध्ये कॅन्सरतज्ञ मोफत कर्करोग तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.
या मोफत ओपीडीचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा असे आवाहन ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटर, चिपळूण आणि रत्नागिरी जिल्हा शासकीय (सिव्हिल) रुग्णालयाच्यावतीने केले आहे. ज्या रुग्णांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे अशा रुग्णांना सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेऊन उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.