सावंतवाडी शहराच्या समस्या सोडवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी शहराच्या समस्या सोडवा
सावंतवाडी शहराच्या समस्या सोडवा

सावंतवाडी शहराच्या समस्या सोडवा

sakal_logo
By

58977
सावंतवाडी ः शहरातील समस्यांबाबत चर्चा केल्यानंतर माहिती देताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी.


सावंतवाडी शहराच्या समस्या सोडवा

मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी; उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वेधले लक्ष

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेसह विविध समस्यांकडे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांचे लक्ष वेधले. यावेळी मच्छी मार्केट परिसरात खत निर्मिती प्रकल्पातून आणि इंदिरा गांधी संकुलातील स्वच्छतागृहातून येणारी दुर्गंधी तत्काळ दूर करण्याची मागणी केली. शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या सोडविण्यासह भटवाडी परिसरात नळ कनेक्शनसाठी खोदलेले रस्ते तत्काळ सुस्थितीत करा, असेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी उपजिल्हा संघटन शब्बीर मणियार, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, राजा वाडकर, सतीश नार्वेकर, प्रवीण वाडकर, शेखर सुभेदार आदी उपस्थित होते.
श्री. मणियार म्हणाले, ‘‘शहरात अनेक समस्या उद्भवत आहेत. मात्र, पालिकेकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. शहरातील रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यात अनेकांना अपघात घडला आहे. ते बुजविण्यासाठी पालिका प्रशासन पुढे येत नाही.’’ येथील केसकर कॉम्प्लेक्स परिसरातील नाल्यावरील छप्पर पूर्णतः तुटले आहे. त्या ठिकाणी अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची तात्काळ दुरुस्ती करावी. मच्छी मार्केट परिसरातील खत निर्मिती प्रकल्प आणि इंदिरा गांधी संकुलातील स्वच्छतागृह दुर्गंधीचे कारण बनले आहे. दोन्ही ठिकाणी दुर्गंधीमुळे नागरिकांना नाक मुठीत धरून चालावे लागत आहे. त्यामुळे या संदर्भात तात्काळ योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात, असे उपस्थितांकडून सांगण्यात आले.
--
चौकट
रस्ता खोदकाम, चर तसेच
भडवाडी परिसरात पाळणेकोंड धरणावरून येणारी पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी ठिकठिकाणी रस्ता खोदण्यात आला आहे. मात्र निर्माण झालेले चर पुन्हा बुजवले नाही. त्यामुळे त्या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. त्याची दुरुस्ती तातडीने करून घ्यावी, अशी मागणी शाखाप्रमुख शेखर सुभेदार यांनी केली.
----------
कोट
सर्व समस्या सोडविण्यासाठी पालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे; मात्र, निधी मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करण्याची गरज आहे. तरच विकासकामे तातडीने मार्ग लागतील.
- जयंत जावडेकर, मुख्याधिकारी, सावंतवाडी पालिका