रत्नागिरी ः टाटा एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः टाटा एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न
रत्नागिरी ः टाटा एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न

रत्नागिरी ः टाटा एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न

sakal_logo
By

(पान १ साठी)

टाटा एअरबसपेक्षा मोठा
प्रकल्प आणण्याचा प्रयत्न
उदय सामंत ; रोजगारासाठी नुसत्या गप्पा मारून नाही उपयोग
रत्नागिरी, ता. २८ ः भविष्यात वेदांता किंवा टाटा एअरबसपेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला गेला असला तरी नागपुरातील मिहानमध्ये हा प्रकल्प साकारण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मी प्रयत्न करत आहे. युवा पिढीसाठी माझे प्रयत्न सुरू असून त्यात माझे काही चुकले नाही. रोजगार देण्यासाठी नुसत्या गप्पा मारून काही उपयोग नाही, असे स्पष्ट मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. टाटा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेल्यावर विरोधक आक्रमक झाले आहे. त्याला उत्तर देताना मुंबईत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
वेदांता - फॉक्सकॉन पाठोपाठ आता नागपुरात साकारण्याचा प्रस्ताव असलेला संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे. हा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये साकारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता. मात्र, आता हाही प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाले आहेत; मात्र भविष्यात वेदांता किंवा टाटा एअरबसपेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणणार असल्याचा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरात यावा यासाठी मी प्रयत्न केले. रोजगार देण्यासाठी नुसत्या गप्पा मारून काही उपयोग नाही,भविष्यात वेदांता किंवा टाटा एअरबसपेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणणार आहे. त्यामुळं बेरोजगारी दूर होण्यास मदत होईल. राजकारणासाठी राजकारण करू नये, विकासासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं आवाहनदेखील उदय सामंत यांनी केले.

कराराचे एकतरी पत्र दाखवावे
टाटा एअरबसच्या प्रकल्पाबाबत अशी माहिती समोर आली की, २१ सप्टेंबर २०२१ला या प्रकल्पाबाबतचा सामजंस्य करार झाला होता. मात्र, करार झाला होता तर त्याबाबतचे मला एकतरी पत्र दाखववावे, असं आव्हान उदय सामंत यांनी विरोधकांना दिलं आहे.