असुर्डेत साकारली गोपाळगडाची प्रतिकृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

असुर्डेत साकारली गोपाळगडाची प्रतिकृती
असुर्डेत साकारली गोपाळगडाची प्रतिकृती

असुर्डेत साकारली गोपाळगडाची प्रतिकृती

sakal_logo
By

rat२८p४३.jpg ः
५८९६८
असुर्डेः कलाधिपती कलामंच या मंडळाने साकारलेली शिवकालीन गोपाळगडाची प्रतिकृती.
-----------
असुर्डेत साकारली गोपाळगडाची प्रतिकृती
कलाधिपती कला मंचाचा उपक्रम; अवकाळी पावसावरही मात
चिपळूण, ता. २९ः तालुक्यातील असुर्डे येथील कलाधिपती कलामंच या मंडळाने गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील अरबी समुद्रालगत असलेल्या डोंगरावरील भव्य शिवकालीन गोपाळगडाची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. ३५ फूट बाय ४० फूट व ६ फूट उंचीच्या अशा भव्य आकारमानात साकारल्यामुळे संपूर्ण परिसरात ती आकर्षण ठरली आहे.
गेले २५ दिवस मंडळातील प्रमुख कलाकार आदित्य साळवी, हर्षद दळवी, ओंकार सावंत, विराज साळवी, वेदांत सावंत, सोहम घोडे, मनीष वैष्णव, विपुल साळवी, कुणाल साळवी, समय थरवळ तसेच सहकारी कलाकार अथर्व दळवी, आयुष दळवी, चैतन्य साळवी, नम्रता वैष्णव, दीपाली दळवी, दिशा साळवी, अनुष्का दळवी, मंथन साळवी, गौरी साळवी, कस्तुरी गुजर, टीना वैष्णव, सिद्धेश साळवी, ऋग्वेद बेर्डे, चिंतन थरवळ, सुयश घोडे, चिन्मय थरवळ, शिवानी साळवी, राज वरेकर, साहिल भंडारी, राहुल जाधव, सुयश शिगवण, करण आदवडे, प्रसाद धनावडे या सर्व सदस्यांनी अविरत मेहनत घेतली.
अवकाळी पावसासारखे अनेक अडथळे येऊनसुद्धा गडाचे काम यशवस्वीरित्या पूर्ण केले. आपल्या कल्पकतेतून व कलेतून इतिहासाची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे. हे मंडळ नेहमी विविध सामाजिक व कलाक्षेत्रातील उपक्रमांमध्ये आपली सामाजिक बांधिलकी व खेडेगावातील कलाकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध उपक्रमांमध्ये अग्रेसर असते याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबवला जातो. मुलांमध्ये एकजुटीची भावना निर्माण व्हावी तसेच परिसरातील दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तू, लेणी, गडकिल्ले सर्वसामान्यांपर्यंत पोहचाव्यात व त्या आताच्या पिढीने जतन करून आपल्या महाराष्ट्राचे वैभव आपला पराक्रमी इतिहास पुढच्या पिढीला माहिती व्हावा, हाच या मंडळाचा मुख्य उद्देश आहे. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हे मंडळ असे उपक्रम राबवत असते.