साळगाव परिसरात बिबट्या दिसल्याने ग्रामस्थ भयभीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साळगाव परिसरात बिबट्या
दिसल्याने ग्रामस्थ भयभीत
साळगाव परिसरात बिबट्या दिसल्याने ग्रामस्थ भयभीत

साळगाव परिसरात बिबट्या दिसल्याने ग्रामस्थ भयभीत

sakal_logo
By

58985
साळगाव ः परिसरात दिसलेला बिबट्या.

साळगाव परिसरात बिबट्या
दिसल्याने ग्रामस्थ भयभीत

परिसरात हिंस्र प्राण्यांचा वावर

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ ः साळगाव परिसरात बिबट्याच्या आगमनाने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंधुदुर्गात गेले काही महिने जंगलमय परिसरात रानटी प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे प्राणी आता नागरी वस्तीत घुसू लागल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. काल (ता.२७) रात्री साळगाव हुमरस रस्त्यावर जंगलमय परिसरात रस्त्याच्या बाजूने बिबट्या ग्रामस्थांच्या नजरेला पडला. वनविभागाने याबाबत सतर्कता पाळून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिक व ग्रामस्थांमधून होत आहे. काही महिन्यापूर्वी कुडाळ शहरात पडतेवडी शाळेच्या पाठीमागे सकाळच्यावेळी बिबट्याचे दर्शन झाले होते. अशा प्रकारच्या घटना वारंवार असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.