आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी गुन्हा दाखल करावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी 
गुन्हा दाखल करावा
आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी गुन्हा दाखल करावा

आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी गुन्हा दाखल करावा

sakal_logo
By

58989
कुडाळ ः येथे भाजप युवा मोर्चाने पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे.

आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी
गुन्हा दाखल करावा

‘कुडाळ भाजप युवा’ची मागणी

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ ः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून तसेच अशोक स्तंभाच्या जागी राणे यांचे छायाचित्र एडिट करून संविधानाचा अपमान करणाऱ्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन कुडाळ भाजप युवा मोर्चातर्फे आज येथील पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री राणे हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे नेते असून त्यांच्याबाबत सोशल मीडियावर राणे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकून तसेच अशोक स्तंभाच्या जागी राणे यांचा फोटो एडिट करून संविधानाचा अपमान केला आहे. संबंधितावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप युवा मोर्चातर्फे करण्यात आली. जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत, जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन तेंडुलकर, सरचिटणीस रुपेश बिडये, जिल्हा उपाध्यक्ष सुश्मित बांबूळकर, सोशल मीडिया युवा जिल्हा संयोजक राजवीर पाटील, युवा मोर्चाचे संदेश सुकळवाडकर, सोशल मीडिया संयोजक राम बांदेलकर, प्रसन्न गंगावणे आदी उपस्थित होते.