रत्नागिरी-जिल्ह्यात 131 जागांसाठी पोलिस भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-जिल्ह्यात 131 जागांसाठी पोलिस भरती
रत्नागिरी-जिल्ह्यात 131 जागांसाठी पोलिस भरती

रत्नागिरी-जिल्ह्यात 131 जागांसाठी पोलिस भरती

sakal_logo
By

पान ३ साठी)

जिल्ह्यात १३१ जागांसाठी पोलिस भरती
रत्नागिरी, ता. २८ : राज्याच्या गृह विभागाने १८ हजार पोलिस कर्मचाऱ्यांची पदे भरण्याची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात १३१ पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत. स्थानिक तरुण, तरूणींचे पोलिस होण्याचे स्वप्न या निमित्ताने पुर्ण होणार आहे. भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण व चालक पदासाठी (एलएमव्ही परवाना) बंधनकारक आहे. वयाची अट खुला वर्ग‚ १८ ते २८ वर्षे, मागासवर्गीय १८ ते ३३ वर्षे अशी आहे. ३ नोव्हेंबर २०२२ पासून अर्ज भरता येणार आहे. तर ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज भरण्याची अखेरची तारीख आहे. कोकणातील चारही जिल्ह्यात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यानिहाय ठाणे ग्रामीण- ६८, रायगड- २७२, पालघर- २११, सिंधुदुर्ग-९९, रत्नागिरी- १३१ जागांचा समावेश आहे.