जखमी केल्याप्रकरणी कुडाळात एकावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जखमी केल्याप्रकरणी
कुडाळात एकावर गुन्हा
जखमी केल्याप्रकरणी कुडाळात एकावर गुन्हा

जखमी केल्याप्रकरणी कुडाळात एकावर गुन्हा

sakal_logo
By

जखमी केल्याप्रकरणी
कुडाळात एकावर गुन्हा
कुडाळ, ता. २८ ः जुन्या वादाचा राग काढून जखमी केल्याप्रकरणी अजय बामण सोळंखे (रा. कुडाळ रेल्वेस्थानकाच्या मागे) याच्यावर येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी आपल्या घरी पतीच्या छातीच्या उजव्या बाजूला पात्याने वार करून जखमी केले, अशी तक्रार जनाबाई शिवा शिंदे यांनी येथील पोलिसांत दिली आहे. यात शिवा शिंदे (रा. रेल्वेस्थानकाच्या मागे) हे जखमी झाले असून त्यांच्यावर कुडाळ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले. ही घटना बुधवारी (ता.२६) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांनी दिली.