‘वरेनियम क्लाऊड’तर्फे सिंधुदुर्गात प्रीपेड कार्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘वरेनियम क्लाऊड’तर्फे
सिंधुदुर्गात प्रीपेड कार्ड
‘वरेनियम क्लाऊड’तर्फे सिंधुदुर्गात प्रीपेड कार्ड

‘वरेनियम क्लाऊड’तर्फे सिंधुदुर्गात प्रीपेड कार्ड

sakal_logo
By

58998
वरेनियम क्लाऊड लिमिटेड

‘वरेनियम क्लाऊड’तर्फे
सिंधुदुर्गात प्रीपेड कार्ड
सावंतवाडी, ता. २८ ः तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या आणि शेअर मार्केट लिस्ट ‘वरेनियम क्लाऊड लिमिटेड’ ग्रामीण भागात ‘रुपे प्रीपेड कार्ड्स’ मार्केटमध्ये आणणार आहे. यासाठी त्यांनी ‘क्यू प्रोसिसिंग सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड’बरोबर करार केला आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना बाजारपेठांमध्ये अनेक सेवांचा लाभ घेता येणार आहे. या योजनेमुळे ‘वरेनियम क्लाऊड लिमिटेड’ आणि ‘क्यू प्रोसिसिंग सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड’ यांच्यातील या महत्वपूर्ण करारामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहक थेट जोडले जातील.
वरेनियम क्लाऊड लिमिटेड प्रथम जिल्ह्यात त्यांच्या मुख्य नेटवर्कद्वारे ''रुपे प्रीपेड कार्ड्स''चे लॉंचिंग (अनावरण) करणार आहे. कंपनी शेतकऱ्यांना जागतिक दर्जाच्या ब्लॉकचेनवर आधारित केवायसी प्रणालींचा लाभ देणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने ''रुपे प्रीपेड कार्ड्स''ची ''केवायसी'' पूर्ण करून घेईल. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांना खरेदी आणि अन्य आर्थिक व्यवहार सहज व सुरक्षित करता येतील. यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना भारतातील ''फिनटेक बूम''मध्ये भाग घेण्यास आणि भारतातील फिनटेक बूममध्ये सहभागी होण्यास मदत होईल. त्यामुळे व्यापाऱ्यांना बीबीपीएसद्वारे बिल पेमेंटसारख्या मूलभूत डिजिटल सेवांचाही आनंद घेता येईल. ग्रामीण भागातील प्रमुख घटक असलेल्या शेतकऱ्यांना नवीन उत्पादनांची माहिती (ऑफरिंग) आणि क्रेडिट यांसारखे फायदे सुद्धा ग्राहकांना देण्यात येतील. ज्याची पूर्ण माहिती कंपनीने लॉंच केलेल्या सिस्टममध्ये असेल. वरेनियम क्लाऊड लिमिटेड फिनटेक क्रांतीचे फायदे अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी ग्रामीण भागातील केंद्रित फि-गिटल इकोसिस्टमचा वापर करणार आहे.