नाटळ बससेवा सुरळीत करा, अन्यथा आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाटळ बससेवा सुरळीत 
करा, अन्यथा आंदोलन
नाटळ बससेवा सुरळीत करा, अन्यथा आंदोलन

नाटळ बससेवा सुरळीत करा, अन्यथा आंदोलन

sakal_logo
By

नाटळ बससेवा सुरळीत
करा, अन्यथा आंदोलन

ग्रामस्थांचा एसटी प्रशासनाला इशारा

कणकवली, ता.२८ : कणकवली नाटळ एस टी बस गेले तीन महिने अनियमित आहे. आठ दिवसांत बससेवा सुरळीत झाली नसल्यास ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या समवेत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नाटळ ग्रामस्थांनी दिला.
निवेदनात म्हटले आहे की, कणकवलीवरून सुटणारी एसटी बस ही गेले तीन महिने अनियमित, वेळेच्या बाहेर येतात. तर अनेक वेळा बस रद्द केल्‍या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. ग्रामस्थ व नोकरदार वर्गाचे हाल होत असून आजारी व्यक्तींना खाजगी वाहनांमुळे आर्थिक भुर्दंड पडत आहे. नाटळ थोरलेमोहूळ व धाकटेमोहूळ अशी एसटी बस पूर्वी दुपारी बाराला व रात्री सातला कणकवलीतून सुटत होती. ती आता अनियमित, वेळेच्या बाहेर व रद्द ही केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थ वैतागले आहेत. या पूर्वीही या बाबत प्रशासनाला निवेदने देण्यात आली. मात्र कार्यवाही झाली नाही. त्‍यामुळे येत्या आठ दिवसांत नाटळ गावची एस.टी. बससेवा सुरू न झाल्‍यास आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून दिला. कणकवली एसटी आगार व्यवस्थापक श्री. डोंगरे यांना नाटळ सरपंचांतर्फे एसटी बस अनियमित येत असल्याने निवेदन दिले. यावेळी उपसरपंच दत्ताराम खरात, सोसायटी अध्यक्ष एन. बी. सावंत, नितीन सावंत, सोसायटी संचालक एम. पी. डोंगरे आदी उपस्थित होते.